शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरच्या नागरिकांना १० तास उशिराने व कमी मिळणार पाणी

By धीरज परब | Updated: April 15, 2023 18:05 IST

- एमआयडीसीच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व उडाल्याने मीरा भाईंदर शहराचा पाणी पुरवठा १० तास बंद झाला .

मीरारोड - एमआयडीसीच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व उडाल्याने मीरा भाईंदर शहराचा पाणी पुरवठा १० तास बंद झाला . त्यामुळे नागरिकांना १० तास उशिरा व कमी दाबाने पाणी मिळणार आहे . 

मीरा भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) कडून पाणी पुरवठा करण्यात येतो. शनिवारी सकाळी बदलापूर येथील एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनी वरील एअर व्हॉल्व उडाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले . त्यामुळे एमआयडिसीने मीरा भाईंदर चा पाणी पुरवठा सकाळी ६ वाजल्या पासून बंद करण्यात आला . एअर व्हॉल्व च्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून दुपारी ४ च्या सुमारास साकेत पंपिंग येथून पाणी पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला . 

१० तास शहराचा पाणी पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना देखील नियोजित तासाने पाणी पुरवठा न होता साधारण  १० तास उशिराने पाणी मिळेल व कमी दाबाने मिळेल . स्टेम प्राधिकरणाचे पाणी सुरु राहणार असले तरी शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत होण्यास दोन दिवस जाणार असल्याने नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी केले आहे .