शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात नवमतदार सव्वादोन लाखांवर

By admin | Updated: January 26, 2017 02:58 IST

मतदारनोंदणीमध्ये ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून परिणामस्वरूप जिल्ह्यात २.२५ लाख नवमतदारांची नोंदणी झाल्याची

ठाणे : मतदारनोंदणीमध्ये ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून परिणामस्वरूप जिल्ह्यात २.२५ लाख नवमतदारांची नोंदणी झाल्याची माहिती बुधवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गडकरी रंगायतनमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात देण्यात आली. ठाण्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यासह संपदा जोगळेकर आणि उदय सबनीस आदी कलाकारांची यावेळी उपस्थिती होती.जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ४ टक्के नवमतदार वाढल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी प्रास्ताविकात दिली. भिवंडी, कल्याण, मुंब्रा, भार्इंदर इत्यादी मतदारसंघांमध्ये नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये तसेच क्रीडा शिबिरांमध्ये मतदानाबाबत जागृती केली. परिवहन कार्यालयात शिकाऊ परवान्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकरिता विशेष कक्ष सुरू करून तिथेही मतदारांची नोंदणी करण्यात आली. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तरच राष्ट्रीय मतदार दिनाचा उद्देश सफल होईल, असे कल्याणकर यावेळी म्हणाले. अभिनेत्री अमिषा पटेल यांनी त्यांच्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. मतदान हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने मतदानानंतर ‘सेल्फी’ घेऊन त्याचा प्रसार करावा. मतदानातूनच देश बदलण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या. देशाला फुलाप्रमाणे घडवायचे असेल, तर देशरूपी झाडाला मतदानाच्या स्वरूपात खतपाणी घालणे आपले कर्तव्य असल्याचे अभिनेत्री संपदा जोगळेकर म्हणाल्या. आयुष्यात मोठा अधिकारी बनायचे असेल, तर अनेक परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. लोकप्रतिनिधी बनण्यासाठी एकच परीक्षा असते. ती मतदारांनी घ्यायची असते. त्यामुळे योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन अभिनेते उदय सबनीस यांनी केले. कार्यक्रमास पोलीस आयुक्त परमबीर सिंग, आयुक्त संजीव जयस्वाल हेदेखील उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यातील विजेत्यांना देखील गौरवण्यात आले. (प्रतिनिधी)