शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

... आणि त्या आशा सेविकांनी मानले सिव्हिल रुग्णालयाचे आभार

By अजित मांडके | Updated: February 10, 2024 15:50 IST

वाढत्या उष्म्यात विविध मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा मोर्चा ठाण्यात येत असताना,  वाटेत अनेक आशा स्वयंसेविकांची तब्येत ढासळली.

ठाणे : वाढत्या उष्म्यात विविध मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा मोर्चा ठाण्यात येत असताना,  वाटेत अनेक आशा स्वयंसेविकांची तब्येत ढासळली. यापैकी सहा आशा स्वयंसेविकांना चक्कर, रक्तदाब शुगर, श्वास घ्यायला त्रास वाढल्याने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातून ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल केल्यावर त्वरित सेविकांवर औषधोपचार केले, त्यांच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाल्याने रुग्णालयाचे सेविकांनी आभार मानले आहेत.आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचा शहापूर ते मंत्रालय पदयात्रा मोर्चा ठाण्याकडे येत असताना, भिवंडी परिसरात अनेक आशा स्वयंसेविका चालताना त्रास झाला. यापैकी गुरुवारी १८ आशा स्वयंसेविका उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी सहा जणींची तब्येत थोडी अधिक बिघडल्याने  शुक्रवारी तात्काळ ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयाने वेळीच योग्य उपचार केल्याने त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेल्या आशा स्वयंसेविकाना रक्तदाब, चक्कर,  शुगर, श्वास घ्यायला त्रास होत होता. यापैकी एक दोघी मोर्चात बेशुद्ध झाले असल्याचे आशा स्वयंसेविकानी सांगितले. मात्र सिव्हिल रुग्णालयात सर्वतोपरी काळजी घेतली गेली. सोनोग्राफी, रक्त तपासणी बरोबर उपचार चांगले केले असल्याची माहिती आशा स्वयंसेविकानी दिली.आशा स्वयंसेविकाच्या मोर्च्यात वाटेत कोणाला त्रास झाला तर त्यांच्या उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयाचे आरोग्य पथक तैनात होते. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे , सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. आळसपुरकर आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम केलं आहे. आशा स्वयंसेविकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून लवकरच त्यांना घरी सोडले जाईल.डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे)सिव्हिल रुग्णालयात आमची चांगली सुश्रुषा केली आहे. एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात देखभाल करतात तशी उत्तम सोय केली होती. इथल्या डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या आस्थेने उपचार करत होते.जयश्री धनगर(आशा स्वयंसेविका, मीठपाडा भिवंडी)

टॅग्स :thaneठाणे