शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यावर रंगले मायबोलीचे प्रेमतरंग, प्रेक्षकांची मिळाली भरभरुन दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 16:23 IST

ब्रह्मांड कट्ट्यावर मायबोली मराठी साहित्य रसिक मंडळ ब्रह्मांड प्रस्तुत प्रेमतरंग हा कार्यक्रम सादर झाला. 

ठळक मुद्दे प्रेमाचे विविध रंग उलगडणारा प्रेमतरंग कार्यक्रम संपन्न प्रेमाचे १२ अविष्कार सादरब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी केले आभार प्रदर्शन

ठाणे: ठाण्यातील ब्रह्मांड कट्ट्यावर रविवारी सांज स्नेह सभागृहात मराठी साहित्य रसिक मंडळाने बनविलेला प्रेमाचे विविध रंग उलगडणारा प्रेमतरंग कार्यक्रम संपन्न झाला.    या कार्यक्रमात मातृप्रेम, पितृप्रेम, बंधु, भगिनीप्रेम, गुरु-शिष्याचे प्रेम, अल्लड प्रेम, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम, पती - पत्नी, निसर्ग, समाजप्रेम, राष्ट्र - भक्ती प्रेम आणि वैश्विक प्रेम असे जीवनाच्या वेगवेगळ््या टप्प्यावर अनुभवास येणाºया प्रेमाचे १२ अविष्कार सादर करण्यात आले. हे सर्व काव्यवाचन, लेख, नाट्य, कथाकथन, नाट्य अभिवाचन, नृत्याभिनय या विविध प्रकारांनी दाखविण्यात आले आणि कार्यक्रमाची रंगत वाढली. या सादरीकरणात प्रेमा तुझा रंग कसा या नाटकातील एक खुसखुशीत नाट्य प्रवेशाचे अभिवाचन अशोक धोपेश्वरकर आणि मीनल कुलकर्णी या दोघांनी केले. यातून पती पत्नीच्या प्रेमाने रसिकांवर भुरळ घातली. ज्योती शहाणे यांच्या राधा कृष्ण प्रेमावरील कविता वाचनावर जादूगार मधुगंधा यांनी अप्रतिम नृत्याविष्कार सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. अरुण दळवी यांनी सादर केलेली बाप कविता प्रेक्षकांना खुपच भावली तर तुळ््या गळा माझ्या गळा हे गीत बंधू भगिनींचे प्रेम सुखावणारे होते. सुनिता पेंडसे व सुनिला वैद्य यांनी बाबा आमटे यांचे समाजसेवेचे प्रेम, कवी महानोर यांचे निसर्ग प्रेम सादर केले तर शामची आई नाट्य प्रवेश मनात घर करुन गेले. सदर कार्यक्रमात अशोक धोपेश्वरकर, अरुण दळवी, विद्या जोशी, ज्योती दोंदे, वर्षा गंद्रे, मधुगंधा काटकर, सुहासिनी भालेराव, मिनल कुलकर्णी, सुनिता पेंडसे, सुनीला वैद्य, वैशाली जोशी, सुधा कुडी, सुनीता हरकारे, वंदना शनवारे, सुषमा ताम्हाणे, छाया धोपेश्वरकर या सभासदांनी भाग घेतला होता. कार्यक्रमास प्रेक्षकांची उत्तम दाद मिळाली. स्वाती चव्हाण, अमृता प्रधान, सुवर्णा जोशी, संगीता कुलकर्णी यांनी निवेदनाची बाजू सांभाळली. मायबोलीच्या अध्यक्षा ज्योती शहाणे यांनी समारोपात अल्लड प्रेमाचे सादरीकरण करुन कार्यक्रमाचा कळस तयार केला. ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. गीता पालवनकर यांच्या हस्ते सर्व कलाकारांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई