शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रंगला नगररत्न पुरस्कार वितरण सोहळा

By admin | Updated: May 11, 2017 01:56 IST

कला, शिक्षण, सामाजिक, उद्योग आणि साहित्य या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणेकरांना रविवारी गडकरी रंगायतन येथे झालेल्या सोहळ्यात पितांबरी ठाणे नगररत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कला, शिक्षण, सामाजिक, उद्योग आणि साहित्य या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणेकरांना रविवारी गडकरी रंगायतन येथे झालेल्या सोहळ्यात पितांबरी ठाणे नगररत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नगर विकास मंचच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांच्या हस्ते देण्यात आला. शिक्षण क्षेत्रासाठी डॉ. विजय जोशी यांना मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या हस्ते, तर सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. अरु ंधती भालेराव यांना प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रासाठीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले उद्योजक मिलिंद नागरे. त्यांना पितांबरीचे कार्यकारी संचालक अजय जोशी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. साहित्य क्षेत्रासाठी लेखक श्रीराम बोरकर यांना प्रसिद्ध लेखक शशिकांत कोनकर यांच्या हस्ते पुरस्कार दिला गेला. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.सोहळ्याच्या सुरुवातीला गुजरातमधील पाटण येथील जमिनीखालील शिल्पमंदिरावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम ‘रानी की बाव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यातील नृत्य आणि अभिनयाचा कलाविष्कार पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या पुरस्कार सोहळ्याला नगरसेविका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, नगरविकास मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष काळे भाजपा ठाणे शहराध्यक्ष अ‍ॅड. संदीप लेले, भाजपाचे ठाणे मनपा गटनेते मिलिंद पाटणकर उपस्थित होते.