शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

ठाण्याच्या महापौरांचा पुन्हा प्रशासनाशी वाद?

By admin | Updated: October 5, 2016 02:34 IST

महापौर आणि पालिका प्रशासनातील आधीचे वाद गाजत असतांनाच त्यात मंगळवारी नव्या वादाची भर पडली. ठाणे कला-क्रीडा महोत्सवाच्या बैठकीवेळी दादोजी कोंडदेव

ठाणे : महापौर आणि पालिका प्रशासनातील आधीचे वाद गाजत असतांनाच त्यात मंगळवारी नव्या वादाची भर पडली. ठाणे कला-क्रीडा महोत्सवाच्या बैठकीवेळी दादोजी कोंडदेव क्रीडागृहात महापौर संजय मोरे आणि माहिती जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्यात निविदा देण्यावरून जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समजते. प्रशासनाची बाजू न पटल्याने महापौरांनी माळवींवर पाण्याची बाटली भिरकवल्याचेही सांगितले जाते. मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कशीबशी समजूत काढून हे प्रकरण मिटवले. नंतर या वृत्ताचा महापौर आणि प्रशासनाने इन्कार केला. मागील महासभेत महापौर संजय मोरे आणि सचिवांतील शाब्दिक बाचाबाचीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आयुक्त घेत असलेल्या काही निर्णयांमुळेही काही महिन्यांपासून महापौर आणि प्रशासनात खटके उडत आहेत. आयुक्तांच्या बाऊन्सरलाही काही दिवसांपूर्वी महापौरांनी खडे बोल सुनावल्याने प्रशासन आणि महापौरांतील वाद उफाळून आला. दरम्यान, पुढील महिन्यात ठाण्यात होणाऱ्या कला-क्रीडा महोत्सवाच्या आयोजनानिमित्त मंगळवारी दुपारी दादोजी कोंडदेव क्रीडागृहात बैठक झाली. तिला मराठी रंगभूमीवरील कलाकारही उपस्थित होते. बैठक सुरु असतांना निविदा कोणाला द्यायची, या मुद्द्यावरुन महापौर आणि माळवी यांच्यात वाद झडल्याची माहिती तेथे उपस्थित असलेल्यांनी दिली. ‘सेंकड लोएस्टवाल्यालाच’ हे काम द्या, असा आग्रह महापौरांनी धरला. परंतु नियमानुसार ‘फर्स्ट लोएस्टवाल्यालाच’ हे काम देता येऊ शकते, हा मुद्दा माळवी यांनी लावून धरला. नियमाला धरुनच ही निविदा काढण्यात आली आहे. त्यानुसारच काम केले जाईल, असे माळवी यांना सांगताच त्यांच्यात आणि महापौरांत शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद उफाळून आल्याचे कळताच शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती आणि नरेश म्हस्के यांनी तेथे धाव घेत वाद मिटवला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार होती. मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने मध्यस्थी करून माळवी यांची समजूत काढल्याचे समजते.