शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ‘जादूचे कपाट’ स्वेटरने भरले ; थंडीत कुडकुडणाऱ्या गरिबांना मदत, अनामिक व्यक्तीचा उपक्रम झाला लोकप्रिय

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 14, 2023 10:04 IST

फलकाच्या खाली लाकडी कपाट ठेवले आहे.

प्रज्ञा म्हात्रेठाणे : येथील डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या गल्लीत कुणी अनामिकाने ‘जादूचे कपाट’ ठेवले असून, तुमच्या कपाटातील अतिरिक्त झालेले कपडे थंडीत कुडकुडणाऱ्या गोरगरिबांकरिता या जादूच्या कपाटात ठेवा, असे आवाहन करणारा फलक लावला आहे. ठाणेकर आपल्या घरातील कपडे आणून या कपाटात ठेवतात व गोरगरीब येऊन त्यांच्या गरजेनुसार हे कपडे घेऊन जात आहेत. ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून ‘जादूचे कपाट’ ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. हे कपाट कोणी ठेवले हे गुपित आहे. डॉ. बेडेकर हॉस्पिटलच्या गल्लीत डोंबिवली नागरी बँकेजवळ जाळीवर एक फलक लावलेला आहे. त्या फलकाच्या खाली लाकडी कपाट ठेवले आहे.

या फलकावर लिहिलेला मजकूर असा की, ‘माझ्या कपाटात गरजेपेक्षा जास्त कपडे होते. म्हणून माझे कपडे मी या जादूच्या कपाटात ठेवले. जेणेकरून ज्याच्याकडे कपडे नाहीत, त्याला माझे कपडे मिळो.’ सामाजिक जाणिवेतून केलेल्या आवाहनाला ठाणेकर प्रतिसाद देत आहेत. ज्यांना गरज आहे ते गोरगरीब कपडे घेऊन जातात, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. 

थंडीच्या दिवसांत ठाण्यातील पदपथांवर अनेक गोरगरीब पांघरूण न घेता जमिनीवर झोपलेले दिसतात.

लहान मुले उघडी फिरत असतात. त्यांना हे जादूचे कपाट वरदान ठरू शकते. 

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्राध्यापिका संज्योत देऊसकर यांनी जादूचे कपाट या उपक्रमाने प्रभावित होऊन कशिश पार्कमध्ये हाच उपक्रम राबविण्याचा मानस फेसबुकवर व्यक्त केला आहे.

थंडीत ठाण्यात वेगवेगळ्या परिसरात जादूची कपाटे दिसू लागतील, अशी अपेक्षा आहे.