शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर उभारणीची कहाणी ठाणेकरांना फाऊंटनच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार

By अजित मांडके | Updated: December 4, 2023 17:39 IST

उपवन परिसरात उभारण्यात येत असलेले म्युझिकल फाउंटनचा आनंद ठाणेकरांना काही दिवसांमध्येच अनुभवयाला मिळणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील उपवन तलाव येथे पहिला म्युझिकल लेझर शो उभारला जाणार आहे. बडोदरा आणि नागपूरच्या धर्तीवर ठाण्यात पहिले म्युझिकल फाऊंटन आणि बनारस घाट साकारण्यात येत असून या फाउंटनच्या माध्यमातून ठाणेकरांना आयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राममंदीराच्या उभारणीची ध्वनिचित्रफीत दररोज पाहायला मिळणार आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने हे फाउंटन आणि घाट उभारण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाकडून १२ कोटींचा निधी देण्यात आला असून बनारस घाटाचे कामही जवळपास ८० टक्क्यांपेक्षा पूर्ण झाले आहे. फाउंटनच्या माध्यमातून केवळ राम मंदिरांच्या उभारणीची कथाच पाहायला मिळणार नसून तर श्रीस्थानक ते ठाण्याची आतापर्यंत झालेली जडणघडण आणि मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे यावर प्रकाश टाकणारी ध्वनिचित्रफीतही ठाणेकरांना पाहायला मिळणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

उपवन परिसरात उभारण्यात येत असलेले म्युझिकल फाउंटनचा आनंद ठाणेकरांना काही दिवसांमध्येच अनुभवयाला मिळणार आहे. अशाप्रकारचे फाउंटन ही बडोदरा आणि नागपूरला उभारण्यात आले आहे. ठाण्यातही अशाप्रकारचे फाउंटन असावे अशी इच्छा सरनाईक यांची होती. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाने याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राम मंदिरांची उभारणी, उभारणीमागची पार्श्वभूमी, नेमके मंदिर कशाप्रकारे असणार आहे हे उपवन तलाव परिसरात बसून  ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय ठाण्याच्या इतिहास सांगणारी तसेच  मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे  ठाणेकरांना यामध्ये पाहायला मिळणार आहे. मनोरंजनसोबतच माहिती देण्याच्या उद्देश यामागे असून विशेष म्हणजे मराठी,हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये हा शो दाखवला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. 

या दोन्ही कामांच्या तयारी विषयीचा आढावा तसेच मतदार संघातील इतर कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सरनाईक यांनी सोमवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यामध्ये ही दोन्ही कामे प्रगतीपथावर असून १२ जानेवारी रोजी या दोन्ही कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. 

बनारस घाटावर होणार महाआरतीउपवन तलाव परिसरात बनारस घाटाचे काम देखील सुरु असून हे काम जवळपास ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत झाले आहे. तर ज्यापद्धतीने बनारस घाटावर रोज महाआरती केली जाते त्याच धर्तीवर ठाण्यात साकारण्यात येत असलेल्या उपवन घाटावर एक दिवस महाआरतीचे आयोजन करण्याचे नियोजित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे