शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जेईई मेन्समध्ये ठाणेकरांचे यश

By admin | Updated: June 19, 2017 04:59 IST

आयआयटीमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रवेश मिळवून देणाऱ्या कठीण आणि सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आयआयटी-जेईई अ‍ॅडव्हान्सचा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आयआयटीमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रवेश मिळवून देणाऱ्या कठीण आणि सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आयआयटी-जेईई अ‍ॅडव्हान्सचा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात ठाण्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यतीन दांडी हा देशात १३५ वा, पार्थ पाटील आरक्षित वर्गातून देशात सहावा, तर रिक्षाचालकाचा मुलगा धनंजय तिवारी देशात १३६४ वा आला आहे. आयआयटी प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. तिच्या दोन पातळ्या विद्यार्थ्यांना पूर्ण कराव्या लागतात. पहिली परीक्षा म्हणजे जेईई मेन्स. यात जवळपास १२ लाख विद्यार्थी दरवर्षी संपूर्ण भारतातून परीक्षा देतात आणि दुसरी म्हणजे जेईई अ‍ॅडव्हान्स्ड. पहिल्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले टॉप दोन लाख २० हजार विद्यार्थी यास पात्र असतात. जेईई अ‍ॅडव्हान्स्ड ही परीक्षा २१ मे रोजी झाली. या परीक्षेत देशातून १५ हजार विद्यार्थी दरवर्षी पास होतात. त्यापैकी यतीन, पार्थ आणि धनंजयने सुवर्णयश मिळवले आहे. पार्थ हा इतर मागासवर्गीय वर्गातून देशात सहावा आला आहे. तो कळवा येथे राहतो. त्याचप्रमाणे खुल्या वर्गातून यतीन हा ठाण्यातून प्रथम आला आहे. त्याचे वडील ठाण्यात डॉक्टर आहेत. सुभाष तिवारी या रिक्षाचालकाचा मुलगा धनंजय तिवारी देशातून १३६४ व्या क्रमांकावर आहे. धनंजयची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या परीक्षेसाठी कोचिंग क्लास लावणे अशक्य होते. धनंजयची परिस्थिती समजल्यावर त्यांनी कोचिंग क्लासची फी पूर्ण माफ केली. एका वर्षाच्या पूर्ण मेहनतीनंतर आणि सर्व परिस्थितीचा सामना करत धनंजयने हे यश मिळवले असल्याचे आयआयटीयन्स पेस एज्युकेशनचे डायरेक्टर प्रवीण त्यागी यांनी सांगितले. धनंजयचे पुढील शिक्षण प्रायोजकत्वाच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.