शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलूंडच्या नवघर पूलावरील ट्रकच्या बिघाडामुळे ठाणेकरांना बसला वाहतूक कोंडीचा फटका

By जितेंद्र कालेकर | Updated: August 28, 2023 13:06 IST

ठाणे ते मुंबई मार्गावर दोन तास खोळंबा: तासाभरासाठी चालकांना मिळाली टोलमुक्ती

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुलूंडच्या नवघर उड्डाण पूलावर नाशिक ते मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावर एक मोठा मालवाहू ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे तो या मार्गावरच सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास बंद पडला होता. त्यामुळे सकाळी ऐन कामाला जाण्याच्या वेळी सुमारे दोन तास या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कोंडी फोडण्यासाठी टोल न घेण्याचे आदेश पोलिस उपायुक्त विनय राठोड यांनी दिल्याने चालकांना काहीसा दिलासा मिळाला. सकाळी १०.३० नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

सोमवारी आठवडयाचा पहिलाच दिवस असल्याने आधीच कल्याण, ठाणे मार्गाकडून मुंबईकडे जाणाºया वाहनांची मोठी गर्दी तीन हात नाका ते मुलूंड चेक नाक्याकडे झालेली होती. त्यात मुलूंडच्या नवघर पूलावर एक मोठा मालवाहू ट्रक सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास बंद पडला. हा ट्रक नेमका रस्त्याच्या मधोमध बंद पडला होता. त्यामुळे ठाण्यातून मुंबईकडे कामानिमित्त खासगी वाहनांनी जाणारे शेकडो चाकरमनी हे या ट्रकच्या मागे लागलेल्या रांगांमध्ये अडकून पडले होते. सोमवार आठवडयाच्या पहिल्याच दिवशी कामावर उशिर होत असल्याने अनेकांना मन:स्ताप सहन करावा लागला.

मुंबई आणि ठाणे अशा दोन्ही बाजूच्या वाहतूक पोलिसांसह कोपरी आणि नवघर पोलिसांची पथकेही याठिकाणी मदतीला आली होती. मात्र, तरीही मुलूंडपासून ठाण्याकडे तीन हात नाक्यापर्यंत तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकीकडे हे वाहन हटविण्यासाठी प्रयत्न सुरु असतांनाच कोंडी कमी करण्यासाठी मुंबई आणि ठाण्याच्या वाहतूक पोलिस उपायुक्तांनी टोल नाक्याच्या अधिकाºयांशी चर्चा करुन सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास टोल न घेताच वाहने सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे या वाहन चालकांना दिलासा मिळाला. शिवाय, कोंडी फुटण्यातही मदत झाली. दरम्यान, १० वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त ट्रकही बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर १०.३० वाजण्याच्या सुमारास ही वाहतूक कोंडी हळूहळू कमी झाली. साधारण ११ वाजेनंतर ही वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एक तास मिळाला टोल दिलासा

वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी सकाळी ९.३० ते १०.३० या एक तासाच्या काळात चालकांकडून टोल घेण्यात आला नाही. त्यामुळे या काळात चालकांना तात्पूरती टोलपासून मुक्ती मिळाली होती.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी