शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना नवीन मीटरचा तुटवडा

By admin | Updated: May 3, 2017 05:39 IST

ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले

ठाणे : ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले असल्याची माहिती समोर आली आहे. महावितरणच्या कार्यालयांमध्ये तुटवडा निर्माण झाल्याने नवीन मीटर बसविणे, जुने मीटर अथवा जळालेले मीटर बदली करावयाचे झाल्यास ग्राहकांना १५ ते २० दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. परंतु, लवकरात लवकर मीटरचाहा तुटवडा भरु न काढण्यात येईल, असा दावा महावितरणने केला आहे. ठाणे शहरातील महावितरणच्या कोलशेत, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर आदी विभागात नविन मीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत भारनियमन वाढल्याने मीटर जळण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. नविन मीटर बसविणे आणि जुने मीटर बदली करणे आदीबाबत अर्ज देण्यासाठी गेल्यावर महावितरणकडून मीटर बसविण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून नाराजीचा सुर उमटू लागाला आहे. याबाबत, महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, मार्च एन्डींगच्या काळात नवीन मीटर कार्यालयांना प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ठाणे महानगर पालिकेने राबविलेल्या रस्ता रूंदिकरण मोहीमेत बाधीत झालेल्या नागरिकांचे वसंत विहार येथील एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन केल्यामुळे त्या ठिकाणी नविन मीटरची मागणी वाढल्याचेही महावितरणने स्पष्ट केले. शिवाय काही ठिकाणी नागरिकांकडूनदेखील जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविण्याबाबतही प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकाच वेळेस जास्तीचा लोड आल्याने ग्राहकांना नवीन मीटरसाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. दरम्यान, ठाणे शहारातील विविध भागात सुमारे २५ हजार नविन मीटर बसविण्यासंदर्भात अर्ज महावितरणला प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ १२ हजार मीटरच सध्याच्या घडीला प्राप्त झाले असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच नादुरुस्त मीटरच्या संदर्भातही काहीसा वेळ लागत असल्याचेही सांगण्यात आले आहे. एकूणच एकाच वेळेस एवढी मागणी झाल्याने महावितरणपुढे पेच निर्माण झाला असल्याने नागरिकांच्या त्रासालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)