शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांवर ४० ते ५० टक्के पाणी दरवाढीची कुऱ्हाड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:36 IST

महासभेत प्रस्ताव : सत्ताधारी शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : टीएमटीच्या भाड्यात पुन्हा वाढ करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरूअसतांना आता दुसरीकडे ठाणे महापालिकेने पाण्याच्या दरात ४० ते ५० टक्यांची वाढ प्रस्तावित करून तसा प्रस्ताव येत्या २० फेबु्रवारी रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ती यंदाच्या अर्थसंकल्पातही सुचविल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने यापूर्वी २०१३ मध्ये करवाढ केली होती. त्यानंतर आता ती सुचविली आहे. यामुळे महानगरपालिकेत सत्तेत असलेली शिवसेना यावर काय निर्णय घेते याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.सध्या महापालिका झोपडीधारकांकडून १३० रुपये आकारत असून इमारतधारकांकडून चौरस फुटामागे २०० ते ५०० रुपये या प्रमाणे पाणीबिलाची वसुली सुरू झाली आहे. यापूर्वी महापालिकेने २०१३ मध्ये पाण्याच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये इमारतधारकांकडून चौरस फुटामागे पाणी बिलाच्या आकारणीस सुरुवात केली. परंतु, आता या दोन्हीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता झोपडीधारकांच्या पाणीबिलात १३० ऐवजी २०० रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. सध्या पाणीपुरवठा विभागाचा वार्षिक खर्च २५० कोटींच्या आसपास आहे. परंतु, उत्पन्न हे केवळ ११० कोटींच्या घरात आहे. ही तूट ६७ टक्यांच्या आसपास आहे. तसेच पालिका इतर स्त्रोतांकडून घेत असलेल्या पाणी खरेदीचेही दर वाढले आहेत. एकूणच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने ही दरवाढ प्रस्तावित केली आहे.एक लाख ३१ हजार ग्राहकांना फटकामहापालिका हद्दीत सध्याच्या घडीला १ लाख २६ हजार ग्राहक असून यामध्ये झोपडी आणि इमारतधारकांचा समावेश आहे. तर वाणिज्य वापराचे ५ हजारांच्या आसपास ग्राहक आहेत. त्यानुसार आता झोपडीधारकांना १३० रुपयांऐवजी २०० रुपये मोजावे लागणार आहेत.यापूर्वी झोपडीधारकांकडून प्रती १ हजार लीटर मागे ७.५० रुपये मोजावे लागत होते.आता त्यासाठी १३ रुपये मोजावे लागणार आहे. ही दरवाढ ज्या ठिकाणी मीटरप्रमाणे पाणीपुरवठा होतो, त्याठिकाणी आणि ज्या ठिकाणी मीटर प्रमाणे होत नाही, त्याठिकाणीही लागू असणार आहे.दुसरीकडे इमारतधारकांकडून यापूर्वी ० ते २५० चौरस फुटामागे २०० रुपये तर २५०० चौरस फुटामागे ५०० रुपये आकारले जात होते. आता २०० चौरस फुटामागे ३०० आणि २५०० चौरसफुटामागे ७५० रुपये आकारले जाणार आहेत.