शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

एसी झोपडीत राहणारा ठाणेकर गरीब कसा?

By संदीप प्रधान | Updated: August 28, 2023 08:33 IST

ठाणे जिल्ह्यात निवाऱ्याचा प्रश्न मुंबई सारखाच जटिल झाला आहे.

कळवा, दिवा खाडीत वर्षानुवर्षे भराव घालून बेकायदा बांधकामे केली आहेत. कळवा खाडीत सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी उभारलेली १२० बेकायदा बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली. कारवाईकरिता गेलेले महापालिकेचे पथक काही घरांना एसी लावलेले पाहून थक्क झाले. अगोदर कच्च्या असलेल्या झोपड्यांच्या जागी आता पक्की घरे उभारली होती व काहींनी आता कुटुंबे वाढल्याने वर मजले चढवले होते. ठाणे जिल्ह्यात निवाऱ्याचा प्रश्न मुंबई सारखाच जटिल झाला आहे.

ठाणे आणि अन्य शहरे ही अत्यंत छोटी गावे होती, स्टेशनच्या लगत वस्ती व बाकी दूरदूरपर्यंत वनराई असे चित्र होते. मुंबईतून १९८०,९० च्या दशकात अचानक लोंढे आदळू लागल्यावर घरांची गरज निर्माण झाली, मग त्यातून अनियंत्रित विकास सुरू झाला. ठाण्यात किमान बरी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अन्य शहरांतील घरबांधणी भीषण स्वरूपाची आहे. मागणी वाढल्यामुळे घरांचे दर वाढले. ठाण्यात ७० ते ८० लाखांच्या खाली घर नाही. नेमक्या याच परिस्थितीचा गैरफायदा भूमाफिया व राजकीय नेत्यांनी घेतला.

सरकारी, महापालिकेचे आरक्षित भूखंड, खाडी किनारे येथे बेकायदा बांधकामे बिनदिक्कत उभी करू दिली. महापालिका, सरकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हात ओले झाले म्हणून किंवा राजकीय नेत्यांच्या दबावातून बेकायदा पाणी, वीजपुरवठा आदी सुविधांचा पुरवठा केला. नागरी कमाल जमीन धारणा कायदा लागू केल्यावर आपली अतिरिक्त जमीन जाणार या कल्पनेने मुंबईत अशीच बेकायदा बांधकामे करण्यास जमीन मालकांनी प्रोत्साहन दिले. सीआरझेडचे नियम कडक झाल्यावर खाडीकिनारी अतिक्रमणे करून या कायदाच्या मूळ हेतूला हरताळ फासला गेला.

एकेकाळी मध्यमवर्गीय घरात पुरेसे पंखे नसायचे. गॅस सिलिंडर मिळवण्याकरिता सव्यापसव्य करायला लागायचे. एसी व फोन घरात असलेली व्यक्ती श्रीमंत गणली जायची. कळव्यातील झोपडपट्टीत आर्थिक सुबत्ता असलेला मोजका मध्यमवर्ग वास्तव्य करीत होता. खरेतर निवारा ही मूलभूत गरज; पण ठाण्यात घर घेणे आवाक्याबाहेर. शिवाय खाडीत बेकायदा उभारलेले हे घर रेल्वे, बाजारपेठ या दृष्टीने सोयीस्कर असल्याने ते सोडून दूरवर घर कशाला घ्यायचे, असा विचार तेथे राहणाऱ्यांनी केला असेल. शिवाय अधिकृत घर घेतल्यावर महापालिकेचे कर भरणे आले. वडिलांनी किंवा आजोबांनी बांधलेल्या कच्च्या झोपडीच्या ठिकाणी आता सिमेंट काँक्रीटचे पक्के घर उभे केले, वर मजला चढवला, घरात टीव्ही, फ्रीज, एसी आदी सर्व उपकरणे आहेत. ‘राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या’, अशीच

स्थिती नव्हे काय? दुर्दैव हेच की, अधिकृत निवारा ही मूलभूत गरज पूर्ण करणारी राजकीय व्यवस्था उभी राहत नाही; पण एसीसारख्या एकेकाळी चैनीच्या मानल्या गेलेल्या वस्तू खरेदी करणारा ‘ग्राहक’ बेकायदा घरात पिढ्यानपिढ्या वास्तव्य करतो.

टॅग्स :thaneठाणे