शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

भीतीच्या चक्रीवादळात सापडले ठाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 01:08 IST

सोशल मीडियावर घबराटीच्या सरी : कोरोनाचे भय गेले वाहून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सोशल मीडिया व मीडियावर मंगळवारपासून पिटण्यात आलेला ‘निसर्ग’ वादळाचा डंका, मुंबई-ठाण्याच्या गाठीशी वादळांचा तुरळक असलेला पूर्वानुभव यामुळे बुधवारी घराबाहेरील वादळाच्या प्रत्यक्ष थैमानापेक्षा ठाणेकरांच्या मनात भीतीचे चक्रीवादळ घोंघावत होते. सायंकाळी ठाणेकरांनी अखेरीस भीती संपल्याबद्दल आणि गेले काही दिवस सहन करीत असलेल्या उन्हाच्या काहिलीतून सुटका झाल्याबद्दल सुस्कारा सोडला.

कोरोनामुळे घरात लॉकडाउन असलेल्या ठाणेकरांना बुधवारपासून मॉर्निंग वॉकला जाण्याची व खुल्या जीममध्ये व्यायामाची मुभा मिळाली होती. परंतु मंगळवारपासून सोशल मीडिया व मीडियावर वादळीची भीती द्विगुणीत करणारे संदेश आल्याने आता या नव्या संकटाने काय वाढून ठेवलेय, अशी भीती ठाणेकरांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातच अनेक नगरसेवक, आमदार यांनी आपल्या मतदारसंघातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर निसर्ग वादळाचा ताशी वेग १०० ते १२० किमी असणार असल्याने घरीच सुरक्षित राहण्याचा सल्ला देणारे संदेश पाठवले होते. अनेक वाहिन्यांनी वेगवेगळ््या समुद्रकिनाऱ्यांवर उभे केलेले वार्ताहर त्यांच्या पाठीमागे उसळणाºया लाटांपेक्षा अधिक उंच भयाच्या लाटा मनामनात उसळतील अशी खबरदारी घेण्याची वर्णने करीत असल्याने ठाणेकर गारठले.

गेले काही दिवस कोरोनाच्या बातम्या व नकारात्मक मानसिकतेत असलेल्या नागरिकांनी वादळाची भीती घेतली होती. मुंबई, ठाणे परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे बरेचदा वादळे या परिसराच्या वाट्याला जात नाहीत. मात्र ‘निसर्ग’ वादळ अखेर दुपारी एक वाजता कोकण किनारपट्टीवर धडकले. दुपारी तीन ते पाच या वेळात ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, शहापूर वगैरे भागात सोसाट्याच्या वाºयासह या वादळाने पिंगा घातला. झाडे कोसळणे, घराचे पत्रे उडवून लावणे यापेक्षा जास्त नुकसान या वाºयाने झाले नाही. मात्र ठाणेकरांच्या मनात थैमान घालणारे भीतीचे वादळ हे प्रत्यक्षातील वादळापेक्षा कितीतरी भीषण असल्याने घराबाहेरच्या वादळाने ते विचलीत झाले नाहीत.स्थलांतरामुळे हानी टळलीच्नवी मुंबईतील खाडी किनारी वास्तव्य करणाºया ६३ नागरिकांचे शाळा क्रमांक ४ येथे तर, मीरा भार्इंदर व उत्तन या भागात समुद्रकिनारी राहणाºया ७०० नागरिकांचे विविध ठिकाणी स्थलांतरित केले.च्कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीसह गणेशघाट, खाडी किनारची झोपडपट्टी, वालधुनी आणि नेतवली परिसरातील ५०० नागरिकाना, तसेच ग्रामीण भागातील म्हारळ, वरप, जू गाव आणि कांबा या चार गावातील ४०० जणांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हलवले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. खाडीकिनारी वास्तव्य करणाऱ्यांचे सुरक्षित स्थळी केलेल्या स्थलांतरामुळे मोठी हानी टळली.

भिवंडीतही झाडे पडलीभिवंडी : भिवंडीत मार्कंडेश्वर मंदिर परिसर , नारपोली येथे मोतीबाई तलाव, सालाउद्दीन हायस्कूल, सोहम हॉस्पिटल परिसर तसेच निशान हॉटेल समोर तसेच शाह आदाम रोडवरील पीर बाबा दर्गा, तसेच दिवान शहा दर्गा अशा सात ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. झाडे घरांवर पडल्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुपारनंतर डोंबिवली, कल्याणमध्ये सामसूमडोंबिवली : चक्रीवादळ व सोसाट्याचा वारा यामुळे पूर्वेत पाच ठिकाणी वृक्ष, झाडाच्या फांद्या पडल्या तर सारस्वत कॉलनीमध्ये एका इमारतीवरील पत्रे उडाले. सकाळच्या वेळी पाऊस असला तरीही जनजीवन सुरळीत होते, दुपारी २ नंतर मात्र रस्त्यावर तुरळक वाहने, वर्दळ दिसून आली. पावसाची संततधार असली तरी शहरात कुठेही पाणी साचल्याने नुकसान झाले नाही. पेडसेंनगर भागात वीज वाहिनीवर झाडाची फांदी पडल्याने काही काळ त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.