शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या खरेदीसाठी ठाणेकरांची गर्दी; बाजारपेठांमध्ये ग्राहकांची एकच झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 00:18 IST

सोशल डिस्टन्सिंगचे वाजले तीनतेरा

ठाणे : दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदी सुरू झाली असून शनिवारी, रविवारी ठाणेकरांनी खरेदीचा जोर वाढवला होता. यावेळी ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवले.

सणासुदीचे दिवस सुरू झाले असून त्यानिमित्ताने ठाण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली असताना दिवाळी लाभदायी ठरेल, अशी दुकानदारांना आशा आहे. ठाणेकरांनी १ नोव्हेंबरपासून थोडीथोडी खरेदी सुरू केली. शनिवारी-रविवारी सुटीचा मुहूर्त साधत ठाणेकर मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले. त्यानिमित्ताने ठाण्यातील मुख्य बाजारपेठेसह गोखले रोड, राममारुती रोड तसेच पूर्वेतील कोपरी मार्केटदेखील कंदील, पणत्या, रांगोळ्यांनी सजले आहे. ठिकठिकाणी विक्री सुरू असून ग्रामीण भागातून पणत्या आणि कंदील विक्रीसाठी आले आहेत. राममारुती रोडवर हे विक्रेते प्रामुख्याने आहेत. आपल्या कुटुंबासह पोटापाण्यासाठी हे विक्रेते येथे दाखल झाले आहेत. 

लहान मुलांना नवीन कपडे, उटणे, नवीन वस्तू, इलेक्ट्रॉनिक तोरण, कंदील, पणत्या, फराळाचे सामान, सजावटीचे साहित्य खरेदी करताना ठाणेकर दिसून आले. सकाळी १० नंतर खरेदीचा जोर वाढत गेला. दुपारी ऊन आल्यावर गर्दी ओसरली असली, तरी दुपारी ४-५ वाजल्यानंतर पुन्हा गर्दी झाली. त्यात वाहतूककोंडीचाही ठाणेकरांना सामना करावा लागला. मात्र, कोरोनाचा धोका कमी होत असतानाच ठाण्यात  नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवले. कोरोनामुळे हातचे राखून ठाणेकरांकडून खरेदी केली जात होती.

टॅग्स :Diwaliदिवाळीthaneठाणे