शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याची वाटचाल डिजिटलकडे

By admin | Updated: June 3, 2016 01:54 IST

ठाणे शहराने इस्रायलच्या मदतीने डिजिटल ठाणे करण्याचा बहुमान मिळवला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि इस्रायली दूतावासाचे वाणिज्यदूत डेव्हिड अकोव्ह यांच्यात

ठाणे : ठाणे शहराने इस्रायलच्या मदतीने डिजिटल ठाणे करण्याचा बहुमान मिळवला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि इस्रायली दूतावासाचे वाणिज्यदूत डेव्हिड अकोव्ह यांच्यात गुरुवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ‘डीजी ठाणे’ हा प्रकल्प राबवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. इस्रायलमधील तेलअवीवच्या धर्तीवर इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे ठाण्याला देशातील पहिले डिजिटल शहर बनण्याचा मान मिळणार आहे.पालिकेच्या नागरी संशोधन केंद्रामध्ये गुरुवारी झालेल्या या बैठकीला तेलअवीव पालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी जोहार शेरॉन, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, इस्रायलच्या टीएसजी आयटी सिस्टीमचे सेल्स व मार्केटिंग डायरेक्टर डेव्हिड ग्रुप, एचडीएफसी बँकेचे गौतम उपस्थित होते.एचडीएफसी बँकेच्या व्हिसाकार्डच्या धर्तीवर या प्रकल्पासाठी प्रीपेडकार्डचा वापर करण्यात येणार असून हे युटिलिटी डीजी कार्ड ग्राहकांच्या आधारकार्ड आणि बँक खात्याशी संलग्न करण्यात येणार आहे. या कार्डाचा वापर सर्वसाधारणपणे क्रेडिट किंवा डेबिटकार्डसारखाच करता येणार असून या कार्डाच्या माध्यमातून धारकास विविध सेवांचे देयक, विविध कर, परिवहन सेवेचे तिकीट आदी सेवांची बिलेभरणे शक्य होणार आहे. तसेच खरेदीही करता येणार आहे. (प्रतिनिधी)