शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे वाहतूक पोलिसांनी २८ दिवसांमध्ये केली तीन कोटींची विक्र मी दंड वसूली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:55 IST

वाहतुकीचे नियम मोडून ई चलानद्वारे आकारलेले दंड थकीत ठेवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या २८ दिवसांत तब्बल तीन कोटींचा भरणा चालकांनी केला आहे.

ठळक मुद्दे ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्हविरुद्धच्या मोहीमेतही होणार वसूली पोलीस उपायुक्तांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाहतुकीचे नियम मोडून ई चलानद्वारे आकारलेले दंड थकीत ठेवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या २८ दिवसांत तब्बल तीन कोटींचा भरणा चालकांनी केला आहे. मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. या तपासणीमध्येही ही थकीत दंड वसूलीची मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी मंगळवारी दिली.ठाणे वाहतूक शाखेने १४ फेब्रुवारी २०१९ पासून सुरु केलेल्या ई चलान मोहीमेद्वारे आतापर्यंत २६ कोटींपेक्षा अधिक दंड ठोठावला आहे. या दंडाच्या रकमेचा भरणा होत नसल्याने याविरुद्ध उपायुक्त पाटील यांनी १ डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली. सुरु वातीला या मोहिमेअंतर्गत प्रतिदिन सुमारे दोन लाख रु पयांचा दंड वसूल केला जात होता. ती रक्कम आता सरासरी १० लाखापर्यंत गेली आहे. गेल्या चार दिवसांपासून मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाईसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेतील तपासणीदरम्यान ई चलानची थकबाकी आढळल्यास ती वसूल केली जात आहे. अशा पद्धतीची कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी स्वत: थकीत दंडाची रक्कम भरून सहकार्य करावे. विशेष म्हणजे ठाण्यात वास्तव्याला असलेल्या काही मराठी सिने अभिनेत्यांसह काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आपल्या थकीत दंडाची रक्कम भरल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या वाहनांद्वारे कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे, याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली असून ती भरण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी त्याचा अवलंब करुन या थकीत दंडाचा भरणा करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.* सर्वाधिक वसूली नारपोलीतूनवाहतूक शाखेच्या नारपोली युनिटने सर्वाधिक ३७ लाख ९१ हजार ३५० रुपयांची थकबाकी वसूली केली. यामध्ये २२ लाख ५८ हजारांच्या रोख रकमेचा समावेश आहे. त्यापाठोपाठ कल्याण युनिटने २६ लाख २७ हजारांचा तर उल्हासनगर युनिटने २५ लाख तीन हजार ७५० रुपये दंडाची वसूली केली. 

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस