शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Thane: ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत ठाणे वॉरियर्सचा विजय

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 4, 2024 16:32 IST

Thane Cricket News: सांघिक प्रयत्नांच्या जोरावर ठाणे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीने स्पोर्ट्समन क्रिकेट अकॅडमीचा सात विकेट्सनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे - सांघिक प्रयत्नांच्या जोरावर ठाणे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीने स्पोर्ट्समन क्रिकेट अकॅडमीचा सात विकेट्सनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली. गोलंदाजांनी स्पोर्ट्समन क्रिकेट क्लबला १२९ धावांवर रोखल्यावर फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत ११,२ षटकात १३१ धावा करत ठाणे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीने विजय निश्चित केला.

प्रथम फलंदाजी करणे स्पोर्ट्समन क्रिकेट क्लबसाठी फायदेशीर ठरले नाही. गौरव भानुशाली (३४), अकिब शेख (३०) आणि कौशिक खरातने (१८) धावा जमवत संघाला सावरले. या डावात झैद पाटणकर तीन, योगेश पाटील दोन, अर्जुन रावत आणि पार्थ चंदनने प्रत्येकी एक बळी मिळवला. विजयासाठी माफक धावांचे आव्हान ठाणे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीने ११.२ षटकात तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १३१ धावांसह पार केले. यंदाच्या रणजी करंडक विजेत्या मुंबई संघातील अजित यादवने १५ चेंडूत ५ षटकार ठोकत विजयाचे लक्ष्य गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली. रमणप्रीत सिंगने ३३, ओम केशकामतने नाबाद ३१ आणि संवेद व्यवहारेने नाबाद ११ धावांची खेळी केली. गौरव सूर्यवंशीने आणि सैफ शेखने एक फलंदाज बॅड केला. अजित यादवला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

संक्षिप्त धावफलक : स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब : १९.५ षटकात सर्वबाद १२९ (गौरव सूर्यवंशी ३४, अकिब शेख ३०, कौशिक खरात १८, झैद पाटणकर ३.५ - २२-३, योगेश पाटील ३-१८-२, अर्जुन रावत ३-२१-१, पार्थ चंदन ४-२१-१) पराभूत विरुद्ध ठाणे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी : ११.२ षटकात ३ बाद १२१ ( अजित यादव ४२, रमणप्रीत सिंग ३३, ओम केशकामत नाबाद २२ संवेद व्यवहारे नाबाद ११,गौरव सूर्यवंशी २-१५-२, सैफ शेख १.२-१५-१). सामनावीर : अजित यादव .

टॅग्स :thaneठाणे