शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात विद्यार्थिनीची छेड काढून मारहाण

By admin | Updated: June 23, 2017 05:52 IST

पोखरण रोडवरील एका विद्यार्थिनीची तीन भामट्यांनी छेडखानी करून तिला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोनवर राहणारी १७

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पोखरण रोडवरील एका विद्यार्थिनीची तीन भामट्यांनी छेडखानी करून तिला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोनवर राहणारी १७ वर्षांची विद्यार्थिनी बुधवारी सायंकाळी शिकवणीसाठी गेली होती. शिकवणी वर्ग आटोपून ती रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी परत जात असताना आॅशर रेसिडेन्सीजवळ तिघांनी तिची छेडखानी करण्यास सुरुवात केली. विद्यार्थिनीने आक्षेप घेतला असता त्यांनी मारहाण करून तिचा विनयभंग केला. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून चितळसर पोलिसांनी दीपू नामक आरोपीसह अन्य दोघांविरूद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला.छेडखानीच्या घटनेची चितळसर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना शोधण्यासाठी मोहीम सुरु केली. ही मुलगी आरोपींना ओळखत नाही आणि ती आरोपींचे फारसे वर्णनही पोलिसांना सांगू शकली नाही. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात चौकशी केली असता, तीनपैकी एका आरोपीची निश्चित माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे नाव दीपू असून, दोन मित्रांसोबत त्याने विद्यार्थिनीची छेड काढली होती. त्याचा ठावठिकाणाही पोलिसांना मिळाला असून, त्याला लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती चितळसर पोलिसानी दिली. त्याच्या अटकेनंतरच या प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींची माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.