शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

Thane: लाच घेताना राज्य कर अधिकारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात

By अजित मांडके | Updated: October 31, 2023 18:37 IST

Thane: जीएसटीसाठी केलेल्या अर्जातील त्रुटी दूर करून शो कॉज नोटीस न बजावण्यासाठी आणि जीएसटी नंबर करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या आणि त्या पोटी  २० हजारांची लाच मागणाऱ्या  राज्य कर अधिकाऱ्यावर ठाणे लाच लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.

- अजित मांडकेठाणे - जीएसटीसाठी केलेल्या अर्जातील त्रुटी दूर करून शो कॉज नोटीस न बजावण्यासाठी आणि जीएसटी नंबर करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या आणि त्या पोटी  २० हजारांची लाच मागणाऱ्या  राज्य कर अधिकाऱ्यावर ठाणे लाच लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. राज्य कर अधिकारी मधुकर ढोक (५७) याला तडजोडीअंती ७ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदार २५ वर्षीय हे टॅक्स कन्सल्टंटचे काम करीत असून त्यांनी त्यांच्या ग्राहकाच्या रजिस्ट्रेशनसाठी अर्ज राज्य कर विभागाकडे केला होता. या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी अर्ज राज्य कर अधिकारी ठाणे मधुकर ढोक (५७) यांच्याकडे सोपविण्यात आला. या प्रकरणात ढोक यांनी अर्जातील त्रुटी दूर करून, शो कॉज नोटीस न बजावण्यासाठी आणि जीएसटी नंबर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार यासाठी तक्रारदाराकडून २० हजाराची लाच मागितली.  मात्र रक्कम जास्त असल्याने तडजोडीअंती ७ हजाराच्या रक्कमेवर व्यवहार निश्चित झाला. दरम्यान तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार मंगळवारी दुपारी लाचलुचपत खात्याच्या अधिकारी आणि स्टाफ यांनी सापळा रचून राज्य कर अधिकारी ढोक याना अटक केली. त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणthaneठाणे