शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सकल मराठा मोर्चाकडून सोमवारी ठाणे "बंद" ची हाक !

By अजित मांडके | Updated: September 8, 2023 22:18 IST

जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत.

ठाणे : जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकल मराठा मोर्चाच्या वतीने  सोमवारी ठाणे बंद पुकारला आहे.

या संदर्भात ठाण्याच्या शासकीय विश्राम गृह येथे शुक्रवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या बैठकीत विविध राजकीय पक्षाशी सबंधीत मराठा समाजाच्या संस्था आणि संघटनानी या बंदला पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती सकल मराठा मोर्चाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी दिली.

जात, धर्म पक्ष आणि नेता बाजूला ठेवून सर्वांनी या बंदला प्रतिसाद देऊन आपल्या हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात सकल  मराठा मोर्चाच्या वतीने हा बंद पुकारला आहे. शुक्रवारी रात्री ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात सकल मराठा मोर्चाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली याबाबत एक बैठक पार पडली. येत्या दोन दिवसात या बंद बाबत  प्रत्येक कार्यकर्त्याची गल्लीबोळात, रस्त्यावर बैठक होणार आहे.

ठाणे बंद मध्ये सर्वांनी सहकार्य करून सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येणार आहे. याबाबत रविवारी एका सभागृहात मोठी बैठक ही आयोजित केली जाणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.