शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे आरटीओला ‘डिजिटल’द्वारे २७ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:18 IST

ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने १ डिसेंबरपासून सर्व शुल्क व कर आॅनलाइन स्वीकारण्यास सुरुवात केली.

ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने १ डिसेंबरपासून सर्व शुल्क व कर आॅनलाइन स्वीकारण्यास सुरुवात केली. डिसेंबर महिन्यातील २५ दिवसांत १२ हजारांहून अधिक लोकांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत. तसेच याच दिवसांत शासकीय तिजोरीत जमा झालेल्या २९ कोटी ५० लाखांपैैकी २७ कोटी ५० लाख रुपये महसूल डिजिटल पेमेंटद्वारे मिळाला. हे प्रमाण ९३ टक्के असल्याने ठाण्याचा नंबर पुणे, पिंपरी-चिंचवड या आरटीओ कार्यालयांनंंतर लागला आहे.प्रादेशिक परिवहन विभागात १६ सेवा यापूर्वीच आॅनलाइन केल्यानंतर ठाणे आरटीओ विभागाने १ डिसेंबरपासून सर्व शुल्क व कर आता आॅनलाइन स्वीकारण्यात येतील, असे जाहीर करून कुठलेही शुल्क भरण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही, असे म्हटले होते. त्यानुसार, १ ते २६ डिसेंबरदरम्यान १२ हजार ८५ जणांनी विविध प्रकारे अर्ज केले. यामध्ये कर (टॅक्स) संदर्भात सर्वाधिक ४ हजार ६२३ अर्ज आहेत. त्यापाठोपाठ वाहनाच्या हस्तांतरणासाठी ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी दोन हजार ५२९ अर्ज आले आहे. तसेच जुन्या वाहनांचे त्रैमासिक, वार्षिक कर भरणे, वाहनांमधील बदल, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र,वाहनावर कर्ज बोजा नोंदवणे,योग्यता प्रमाणपत्र आदी त्यासाठी लोकांनी अर्ज केले आहे. त्याचबरोबर कर आणि इतर शुल्क असा एकूण २७ कोटी ५० लाखांचा महसूलजमा झाला आहे. यामध्ये दोन कोटी रुपयांचा महसूल हा कॅशस्वरूपात स्वीकारला असून उर्वरित डिजिटल पेमेंटद्वारे जमा झाला आहे.>हेल्प डेस्कवर भर देणारआॅनलाइन येणाºया काही अडचणी सोडवण्यासाठी हेल्प डेस्क सुरू करणार आहे. तसेच बस आणि ट्रक यासारख्या असोसिएशन आणि वाहनविक्रेत्यांसाठी लवकरच आॅनलाइन सेवेबाबत शिबिर घेतले जाणार आहे.>२० हजार कागदांची बचतआॅनलाइन सेवा सुरू झाल्याने कागदांची बचत होऊ लागली आहे. एखाद्या कामाला साधारणत: दोन पावत्या दिल्या जात होत्या. त्या आता द्याव्या लागत नाहीत. त्यामुळे सध्या तरी २० हजार कागदांची बचत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.>‘‘१ डिसेंबरपासून आतापर्यंत आॅनलाइन सेवेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. यामध्ये काही अडचणी आहेत. पण, त्या अडचणी सोडवून ती सेवा अजून चांगली कशी करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे.’’- जितेंद्र पाटील, अधिकारी, ठाणे आरटीओ (कोकण विभाग)

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस