शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रांसारख्या विविध पुस्तकांनी सजला वाचनाचा कोपरा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 5, 2024 16:22 IST

'चला वाचूया' उपक्रमात वाचनालयाची निर्मिती, आयुक्त बांगर यांची संकल्पना

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून वाचनप्रेमींसाठी निर्सग वाचनालय, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘वाचनाचा कोपरा’ हे उपक्रम आकाराला येत असतानाच 'चला वाचूया' या मोहिमेत आणखी एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाबाहेर छोटेखानी वाचनालय तयार करण्यात आले आहे. या वाचनालयात मराठी आणि इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंडात्मक चरित्र, ययाती, कोसला, रणांगण, फकिरा या सारख्या कादंबऱ्या, खरेखुरे आयडॉल्स, व्यक्ती आणि वल्ली, नापास मुलांची गोष्ट, बनगरवाडी यांच्यासह नटसम्राट, अग्रिपंख, प्रकाशवाटा, एक होता कार्व्हर आदी पुस्तके या वाचनालयात आहेत. त्यांच्या जोडीला, सेपिअन्स, ब्लॅक स्वॅन, इलॉन मस्क, इकेगाई आदी इंग्रजी पुस्तकेही येथे वाचनासाठी उपलब्ध आहेत. या वाचनालयाला वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. आयुक्त कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी असलेल्या प्रतिक्षालयात हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या प्रतिक्षालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा. इथे बसून सगळे पुस्तक वाचून होणार नाही, मात्र त्या पुस्तकांची ओळख होईल आणि मग त्यातून ते पुस्तक मिळवून संपूर्ण वाचण्याची ओढ लागू शकेल, असा विचार हे वाचनालय सुरू करण्यामागे असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनने आपले दैनंदिन आयुष्य पूर्णपणे व्यापले आहे. मात्र तरीही छापील वर्तमानपत्र, पुस्तक वाचण्याची आपल्यात असलेली नैसर्गिक उर्मी आजही कायम आहे. त्याला सकारात्मक उर्जा देण्यासाठी समोर पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध असली पाहिजेत. या प्रतिक्षालयात जो काही वेळ लागतो तो वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरावा, अशी या वाचनालयामागची प्रेरणा आहे, असेही  बांगर यांनी स्पष्ट केले.वाचनाने व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडून येतो. ज्यांच्या वाचनाशी, पुस्तकांशी संपर्क येतो त्या व्यक्तींमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासोबतच विचार करण्याच्या क्षमतेचा विस्तारही झालेला दिसतो. शिवाय, वाचनाची मैत्री ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकते, असेही बांगर म्हणाले.

अच्युत पालव यांच्या सुलेखनाने सजल्या भिंतीया वाचनालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रतिक्षालयाच्या भिंतींवर, आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेले सुलेखनकार अच्युत पालव यांनी साकारलेल्या अक्षरशिल्पांच्या चित्रप्रतिमा विराजमान झाल्या आहेत. वाचनासंबंधींचे थोरामोठ्यांच्या विचारांसोबतच अक्षर, शब्द यांचे विभ्रम पालव यांनी सुलेखनातून सुरेख साकारले आहेत. 

ठाणे शहर हे वाचनस्नेही बनविण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम महापालिकेने सुरू केले आहेत. त्यात, ठाणे महापालिकेच्या उद्यानात निर्सग वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. झोपडपट्टी तेथे वाचनालय हा उपक्रमही लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर, महापालिकेच्या सर्व शाळांमधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्यांमध्ये ‘वाचन कोपरा’ तयार करण्यात येत आहे. या उपक्रमाचा पहिला प्रयोग किसन नगर येथील शाळा क्रमांक २३मध्ये करण्यात आला आहे. या वाचन कोपऱ्यातील पुस्तके वाचून विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या वाचनाच्या पासबुकमध्ये त्या पुस्तकाबद्दलच्या नोंदी करायच्या आहेत. याही उपक्रमाचे उद्घाटन मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे