शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Thane: राजावाडी क्रिकेट क्लबला विजेतेपद, अर्जुन मढवी स्मृतीचषक महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 23, 2023 16:34 IST

Thane News: राजावाडी क्रिकेट क्लबने पदार्पणालाच अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या रिगल क्रिकेट क्लबचा चार धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित चौथ्या अर्जुन मढवी स्मृतिचषक महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - राजावाडी क्रिकेट क्लबने पदार्पणालाच अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या रिगल क्रिकेट क्लबचा चार धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित चौथ्या अर्जुन मढवी स्मृतिचषक महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. राजावाडी क्रिकेट क्लबने १४५ धावांचा पाठलाग करणाऱ्या रिगल क्रिकेट क्लबला १४१ धावांवर रोखत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. निर्णायक लढतीत ५९ धावांची खेळी करत सामन्याला कलाटणी देणारा अप्रतिम झेल पकडणाऱ्या विजेत्या संघाच्या सलोनी कुष्टेला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हूणन सन्मानित करण्यात आले.

रिगल क्रिकेट क्लबची कर्णधार हर्षल जाधवने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हर्षलचा हा निर्णय चुकीचा ठरवताना सोनाली आणि राजावाडी संघाची कर्णधार शेरील रोझारिओने तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. सलोनीने ५४ चेंडूत आठ चौकारासह ५९ धावा केल्या. तर शेरिलने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ४२ चेंडूत आठ चौकार मारत नाबाद ५८ धावा केल्या. चेतना बिश्त आणि हर्षल जाधवने प्रत्येकी एक विकेट मिळवली. या आव्हानाचा पाठलाग करताना शृष्टी नाईक आणि पूनम खेमनारने तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत रिगल संघाला विजयाची आस दाखवली. पण पूनम बाद झाल्यावर रिगल संघाच्या धावांचा ओघ मंद झाला.

पूनमने ४३ आणि शृष्टीने ४१ धावा केल्या.त्यानंतर मोनिका तिवारीने दमदार फलंदाजी करत पुन्हा एकदा संघाला विजय दृष्टीक्षेपात आणून दिला. षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात मोनिकाच्या उत्तुंग फटक्याचे झेलात रूपांतर करून सलोनीने रिगल संघाच्या विजयाच्या आशा संपुष्ठात आणल्या. मोनिकाने २० धावा केल्या. निविया आंबरेने प्रतिस्पर्ध्याच्या महत्वाच्या चार फलंदाजाना बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. स्पर्धेतील विजेत्यांना भारताच्या पहिल्या कसोटी महिला पंच वृंदा राठी, मुंबई क्रिकेट संघटनेचे सहसचिव दीपक पाटील, मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी कौशिक गोडबोले, मंगेश यादव, प्रमोद यादव, मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवड समिती सदस्या श्रद्धा चव्हाण, स्पर्धेचे प्रमुख संयोजक डॉ राजेश मढवी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. 

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : सर्वोत्तम फलंदाज : सृष्टी नाईक (रिगल क्रिकेट क्लब),सर्वोत्तम गोलंदाज : कोमल जाधव (रिगल क्रिकेट क्लब).सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : ख़ुशी गिरीस्पर्धेतील सर्वोत्तम : हर्षल जाधव ( रिगल क्रिकेट क्लब)अंतिम सामन्यातील सर्वोत्तम : सलोनी कुष्टे (राजावाडी क्रिकेट क्लब).

टॅग्स :thaneठाणे