शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पावसाचा एक बळी; ३१६ मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:14 IST

दोन दिवसांच्या कडकडीत उन्हानंतर जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. या पावसादरम्यान ठाणे शहरात पातलीपाडा येथे भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.

ठाणे : दोन दिवसांच्या कडकडीत उन्हानंतर जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. या पावसादरम्यान ठाणे शहरात पातलीपाडा येथे भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. प्रकाश वाळवे (३५) असे यातील मृताचे नाव असून भारती वाळवे (२९) या गंभीर जखमी झाल्या आहेत. समय जाधव हा १० वर्षीय मुलगादेखील जखमी झाला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी झाली.सर्वत्र पडलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे.जिल्ह्यात मागील २४ तासांच्या कालावधीत ३१६ मिमी पाऊस पडला आहे. जिल्हा प्रशासनाने या पावसाची नोंद घेतली असून ती सरासरी ४५.१४ मिमी. अशी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ७२३.३० मिमी. पाऊस पडला आहे.मागील वर्षी जुलै महिन्यापर्यंत सरासरी ९७० मिमी पाऊस पडला होता. तुलनात्मकदृष्ट्या आतापर्यंत सरासरी २४६.७६ मिमी. पाऊस जिल्ह्यात कमी पडला आहे.या काळात भातसा धरणात ३५२ मिमी सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर बारवीत केवळ ७६.५३ मिमी, तानसात ३७, मोडकसागरमध्ये ६८, आध्रांत ८९.३५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.मात्र, मध्यरात्री मुंबईत मुसळधार पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक मंगळवारी दिवसभर कोलमडले होते. ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेही २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे ठाणे, कल्याण - डोेंबिवलीसह कर्जत, कसारा, नवी मुंबई आदी परिसरातील चाकरमान्यांचे हाल झाले.

टॅग्स :thaneठाणे