शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ठाणे वर्षा मॅरेथॉन : एक धाव शाळेसाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:45 IST

येत्या रविवारी होणाºया ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणे शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्र ीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूलचे माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी होणार आहेत.

 ठाणे : येत्या रविवारी होणाºया ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणे शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्र ीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सरस्वती सेकंडरी स्कूलचे माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी होणार आहेत. स्मार्ट सिटीतली स्मार्ट शाळा हे त्यांचे घोषवाक्य आहे.‘एक धाव शाळेसाठी’ हा विचार मनात बाळगून ही मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करण्याचा या माजी विद्यार्थ्यांचा मनसुबा आहे. या शाळेची माजी विद्यार्थिनी अस्मिता चितळे हिने जिम्नॅस्टिक खेळात क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार मिळवला आहे.गेली अनेक वर्षे शाळा, बास्केटबॉल जिम्नॅस्टिक, व्हॉलिबॉल, हॅण्डबॉल, कबड्डी आणि खोखो या खेळांत राज्यस्तरावर नेत्रदीपक कामगिरी करत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात शाळेचे अनेक आजीमाजी विद्यार्थी नावारूपाला आले आहेत. या सर्वांची माजी विद्यार्थ्यांना ओळख व माहिती व्हावी, यासाठी विशेष कार्यक्र म संस्थेच्या क्रीडा संकुलाच्या सभागृहात त्याच दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत आयोजित केला आहे. या वेळी शाळेचे आजी विद्यार्थी आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन आणि धावपटूंचे स्वागत आणि गौरव करतील.या स्पर्धेत आणि त्या निमित्ताने आयोजित होणाºया विशेष कार्यक्र मात जास्तीतजास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शाळेचे माजी विद्यार्थी विवेक जोशी, निनाद नातू, अनिता थत्ते वैदेही आणि राजश्री यांनी केले आहे.या मॅरेथॉनचे वैशिष्ट्यपन्नाशीच्या आसपासचे माजी विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. १९८४ च्या बॅचचे हे विद्यार्थी आहेत. जवळपास २५ माजी विद्यार्थी यात असतील. अर्ध मॅरेथॉन या प्रकारात हे विद्यार्थी धावतील, असे सुरेंद्र दिघे यांनी सांगितले.