शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

ठाणे : पोलिसांची करडी नजर : थर्टी फर्स्ट साजरा करा.. पण जरा जपूनच!,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:21 IST

नाताळ तसेच थर्टी फस्ट आणि नववर्ष स्वागताची पार्टी जरुर करा... पण पार्टीच्या नावाखाली दारु पिऊन कुठेही हुल्लडबाजी करणाºयांवर पोलिसांकडून कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर येऊरच्या ७५ बंगलेधारक तसेच हॉटेल चालकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी या बंगलेधारकांवर राहणार असल्याचे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.

जितेंद्र कालेकर ठाणे : नाताळ तसेच थर्टी फस्ट आणि नववर्ष स्वागताची पार्टी जरुर करा... पण पार्टीच्या नावाखाली दारु पिऊन कुठेही हुल्लडबाजी करणाºयांवर पोलिसांकडून कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर येऊरच्या ७५ बंगलेधारक तसेच हॉटेल चालकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी या बंगलेधारकांवर राहणार असल्याचे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळामधील सर्वच ३५ पोलीस ठाण्यांचा आयुक्तांनी आढावा घेतला. नाताळ आणि ३१ डिसेंबर अर्थात २०१७ या वर्षाला निरोप देणारी आणि नववर्षाच्या स्वागताच्या निमित्त येऊर, उपवन, कल्याणची खाडी किनारे, ढाबे आणि हॉटेल्समध्ये पाटर्यांचे बेत आखले जात आहेत.अनेकदा परवाना नसतांनाही अशा पाटर्यांचे आयोजन केले जाते. पार्टीच्या नावाखाली हुल्लडबाजी, धांगडधिगा घालून हाणामारीचेही प्रकार सर्रास घडतात. यावर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही करडी नजर ठेवणार आहेत. दोन वर्षापूर्वी येऊरमध्ये एका हॉटेलच्या आवारात पार्टी सुरु असतांना एकाने हवेत गोळीबार केला होता.या पार्श्वभूमीवर येऊरमध्ये विनापरवाना चालणाºया सर्व हॉटेल्सवर कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. विनापरवाना पार्टी करणाºयांवर टेहळणी करण्यासाठी ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर आदी भागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १२ निरीक्षकांची पथके तैनात केल्याचे अधीक्षक नाना पाटील यांनी सांगितले.येऊर, उपवनसह ठाण्यातील अनेक भागात विशेष बंदोबस्त ठेवल्याची माहिती वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी दिली.त्यासाठी नाकाबंदीही करणार असल्याचे ते म्हणाले. तर महामार्ग, हॉटेल्स आणि मॉल्स कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खास गस्ती पथकांची टेहळणी राहणार असल्याचे ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीthaneठाणे