शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरातील सेवेकरी, पुजाऱ्यांची नोंद ठेवण्याचे ठाणे पोलिसांचे आदेश; संघटनेच्या मागणीला यश

By जितेंद्र कालेकर | Updated: September 20, 2024 23:22 IST

दाेन महिन्यांपूर्वी विवाहितेवर झाला हाेता बलात्कार

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: काही महिन्यांपूर्वी डायघर भागातील एका मंदिरातील पुजारी आणि सेवेकरींनी एका विवाहितेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे मंदिरातही महिला सुरक्षित नसल्याच्या तीव्र भावना निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर ठाण्यातील समाजसेवक तथा ठाणे जिल्हा भुमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष कोळी, प्रफुल वाघोले, मनीष वैती, मेघनाथ घरत, समीर भोईर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे मंदिरातील सेवेकरी आणि पुजारी यांची माहिती पोलिसांना देऊन पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची मागणी केली होती.

या मागणीनंतर पोलिसांनी या मागणीची गांभिर्याने दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व मंदिरांतील सेवेकरी व पुजार्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश स्थानिक पोलीस ठाण्यांना दिले आहेत. शाळा, मंदिर आणि आरोग्य, व्यावसायिक सर्वच क्षेत्रांत दिवसेंदिवस महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागत आहे. अशावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी शासन स्तरावर राज्य सरकारकडूनही कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र डायघर मधील मंदिरात सेवेकरी आणि पुजार्यांनी केलेल्या अत्याचारासह हत्येच्या घटनेनंतर दिव्यासह ठाणे शहर हादरले होते.

सर्वत्र तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, ठाण्यातील समाजसेवक अक्षय कोळी यांनी ठाण्याचे पोलीस आायुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे मंदिरातील सेवेकरी व पुजारी यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी याबाबत गांभिर्याने दखल घेत स्थानिक पोलीस ठाण्यांना शहरातील सर्व मंदिरातील सेवेकरी व पुजारी यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. भुमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष कोळी यांच्यासह शिष्टमंडळाच्या मागणीला यश आल्याने मंदिर परिसरात मुली- महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा बसू शकेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :thaneठाणे