शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलिसांनाही वाहनबळ!

By admin | Updated: May 26, 2017 00:09 IST

आधी केवळ मुंबई, पुणे आणि नागपूरला असलेल्या पीसीआर कार आता ठाणे पोलिसांनाही देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधी केवळ मुंबई, पुणे आणि नागपूरला असलेल्या पीसीआर कार आता ठाणे पोलिसांनाही देण्यात आल्या आहेत. एखाद्या घटनेबाबत नियंत्रण कक्षाकडे कॉल गेल्यास किंवा नियंत्रणकक्षाने कॉल दिल्यानंतर ठाणे आयुक्तालयातील कोणत्याही पोलीस ठाण्याचे पथक आता अवघ्या सहा ते आठ मिनिटांमध्ये प्रतिसाद देईल आणि योग्य ती कारवाई करेल, अशी ग्वाही राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाण्यात दिली.ठाणे पोलिसांच्या ताफ्यात नवीन पीसीआर दोनच्या (पोलीस नियंत्रण कक्षाची व्हॅन) ३५ कार आणि १० अतिरिक्त लाईट व्हॅनचे वाटप झाले. या नव्या कोऱ्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून माथूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या तुलनेत ठाणे पोलिसांकडे या वाहनांची कमतरता होती. शिवाय, आधी ठाणे आयुक्तालयातील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ दोन जीप आणि एक पीसीआर व्हॅन होत्या. परंतु, पोलीस ठाण्यांतील कामकाजांमध्ये ही वाहने अपुरी पडत होती. त्यामुळे प्रतिसादाचा वेळ कमी होणार असून, अधिक परिणामकारक गस्त घालणे शक्य होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील गैरप्रकार नियंत्रणात येतील. पोलीस नियंत्रण कक्षाला एखाद्या नागरिकाने अनुचित घटनेची माहिती दिली तर ते तात्काळ या पीसीआर व्हॅनला कॉल देतील. हा कॉल मिळताच पीसीआर व्हॅन मदतीला येणार असल्यामुळे नागरिकांना तात्काळ मदत करणेही पोलिसांना शक्य होणार आहे. शिवाय, दुचाकी वाहनांचीही कायदा सुव्यवस्थेसाठी मदत होणार आहे.गस्तीसाठी उपयोगदोन कोटी २७ लाख ५० हजारांमध्ये ३५ वाहनांची खरेदी झाली आहे. या कारमध्ये जमादारासह चार कर्मचारी दिवसा आणि रात्र गस्तीसाठी तैनात राहणार आहेत. यामध्ये प्रथमोपचार साहित्यासह एसएलआर, गॅसगन, १२ बोअर रायफल अशी शस्त्रसामुग्रीही असेल. प्रत्येक वाहनात एक टॅब बसविला असून, त्याद्वारे वाहनाचे लोकेशन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना स्क्रिनवर दिसणार आहे. तसेच घटनास्थळाचे फोटो काढून व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून ते नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्याची सुविधाही यात आहे. त्यामुळे न्यायालयात पुराव्यासाठीही त्यांचा उपयोग होणार असल्याचे माथूर यांनी सांगितले.