शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रात्रीस चाले खड्डे बुजवण्याचा खेळ, पालकमंत्र्यांसह आयुक्तांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 03:40 IST

विरोधकांनी खड्डे बुजवण्याच्या कामाचेही बॅनर लावावेत

ठाणे : रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्यांवरून वारंवार टीका होऊ लागल्यानंतर ठाणे महापालिकेने दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या मोहिमेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा मंगळवारी रात्री पालिका प्रशासनासमवेत रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. त्यानुसार, पहाटे ३ वाजेपर्यंत खड्डे बुजवण्याची मोहीम शहराच्या विविध भागांत सुरू होती.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून खड्डे बुजवण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा अवलंब केला जात आहे. त्यात येत्या काही दिवसांवर महापौर वर्षा मॅरेथॉन आणि गणेशोत्सव सण येऊ लागल्याने आणि पालिका प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर खड्ड्यांच्या मुद्यावरून टीकेची झोड उठू लागल्याने अखेर पालिकेने ते बुजवण्याच्या मोहिमेला वेग आणला आहे. मंगळवारपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरली असून वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून रात्रीच्या वेळी ते भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली.महत्त्वाचे म्हणजे शहरामध्ये येणारे आणि बाहेर जाणारे रस्त्यांवर लक्ष केंद्रित करून ते भरण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार, मंगळवारी रात्री आनंदनगरनाका, तीनहातनाका पूल, नितीन कंपनी पूल, कॅसल मिल, मानपाडा जंक्शन, दोस्ती इम्पिरिया, ब्रह्मांड, कोलशेत, ढोकाळीनाका, श्रीरंग सोसायटी, एसटी कार्यशाळा, खारटन रोड, मल्हार सिनेमा चौक आदी ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम पहाटे ४ पर्यंत सुरू होते. या सर्व ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पहाटे ३ पर्यंत पाहणी करून खड्डे बुजवण्याचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही, याची पाहणी केली. ही मोहीम तीन दिवस चालणार असून आयुक्त स्वत: तीनही रात्री या कामाची पाहणी करणार असून त्यांच्या कामाचे एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.

खड्ड्यांच्या मुद्यावरून बॅनर, पोस्टर लावून विरोधक टीका करत आहेत. मग महापौर, आयुक्त हे स्वत: रस्त्यावर उतरून खड्डे बुजवत आहेत. च्त्यांचेही बॅनर त्यांनी लावावेत, अशी खोचक टीका पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रॅफिक पार्कच्या लोकार्पणाच्या निमित्ताने केली.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका