शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या उद्यानात सिंगापूर, अमेरिकेतील प्रसिद्ध शिल्पांची हुबेहूब प्रतिकृती ठरणार आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:36 IST

कशिश पार्क येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

ठाणे : सिंगापुरात जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या सुप्रसिध्द ‘गार्डन बाय द बे’ या उद्यानातील बेबी स्कल्पचर व अमेरिकेतील जॉय ऑफ म्युझिक स्कल्पचर अशा आंतरराष्ट्रीय शिल्पांची हुबेहूब प्रतिकृती ठाण्यातील कशिश पार्क येथे नव्याने लोकार्पण झालेल्या महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात साकारण्यात आले आहे. या उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून, हे उद्यान कशिश पार्कवासीयांसाठीच नाही, तर सर्व ठाणेकरांसह इतर शहरांतून येणाऱ्या नागरिकांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून परिचित होईल असे गौरवोद्गार शिंदे यांनी यावेळी काढले.ठाण्याच्या प्रभाग क्र.१९ मधील तीनहात नाका ते ॲपलब सर्कल, एल.बी.एस. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा आणि रहेजा गृहसंकुलालगतच्या सेवारस्त्याच्या डांबरीकरणाच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. यामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व स्थानिक शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांच्या प्रयत्नातून हे उद्यान साकारण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मुख्यालय (उद्यान) विजयकुमार म्हसाळ, वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानाच्या प्रतिकृतीची कीर्ती पसरेल, तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विकासनिधीचा सुयोग्य वापर कसा करावा, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची पोचपावती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे