शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Thane News: अंबादास दानवेंनी देवीकडे केलेल्या त्या मागणीवरून त्यांची संस्कृती दिसते, शंभूराज देसाईंची टीका

By अजित मांडके | Updated: September 29, 2022 16:07 IST

Shambhuraj Desai: आपण सगळ्यांचं भलं कर असं आपण देवाकडे मागणं करतो, दानवे यांनी जे वक्तव्य केलय कोणाचे वाईट कर या त्यांच्या मागण्या वरुन दानवेंची संस्कृती लक्षात येते असे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले.

- अजित मांडके ठाणे - आपण सगळ्यांचं भलं कर असं आपण देवाकडे मागणं करतो, दानवे यांनी जे वक्तव्य केलय कोणाचे वाईट कर या त्यांच्या मागण्या वरुन दानवेंची संस्कृती लक्षात येते असे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले.

ठाणे जिल्ह्यात यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून काम केलं . तसेच काम यापुढे मी करीन असं वक्तव्य राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाण्यात केलं.पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शंभूराज देसाई हे प्रथमच गुरुवारी ठाण्यात आले होते . यावेळी त्यांनी टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतलं .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करीन असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं . यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं आहे . त्यांनी जसं काम केलं आहे तसेच काम करण्याचा मी प्रयत्न करीन. ठाणे जिल्हा हा खूप मोठा आहे येथे काम करताना मुख्यमंत्री शिंदे ज्या सूचना देतील  आणि जी दिशा दाखवतील तसेच काम करीन असं देसाई यांनी सांगितलं .

यावेळी देसाई यांना रश्मी ठाकरे याही गुरुवारी टेंभी नाका येथील देवीचं दर्शन घ्यायला येणार आहेत. याबाबत विचारलं असता . देवीचं दर्शन घ्यायला कोणालाच मनाई नाही. परंतु टेंभी नाक्याच्या देवीचा आशीर्वाद हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच पहिल्यापासून राहिला आहे . आमची श्रद्धा आहे कि यापुढेही आम्ही आमचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे कार्य करतो आहे त्यालाच या देवीचा आशीर्वाद कायम राहील असं देसाई यांनी स्पष्ट केलं .

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईAmbadas Danweyअंबादास दानवेthaneठाणे