शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र साठेंना पी. सावळाराम, कुबल यांना गंगा-जमुना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 03:09 IST

ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे यांना, तर आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांना गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे

ठाणे  - ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे यांना, तर आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांना गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी केली. तर, साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महेश केळुसकर, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रा. प्रदीप ढवळ, तर प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.जनकवी पी. सावळाराम पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५१ हजार आणि सन्मानचिन्ह असे आहे. तर, गंगा-जमुना पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५१ हजार आणि सन्मानचिन्ह असे आहे. साहित्यिक क्षेत्र तर शैक्षणिक आणि लक्षवेधी कलाकार म्हणून दिल्या जाणाºया पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये २१ हजार आणि स्मृतिचिन्ह असे आहे.सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. याप्रसंगी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, विनय सहस्रबुद्धे, कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अ‍ॅड. निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृहनेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा शर्मिला गायकवाड (पिंपळोलकर), क्र ीडा व समाजकल्याण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दीपक वेतकर, जनकवी पी. सावळाराम कला समिती अध्यक्षा डॉ. कल्पना पाठारे आणि जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त संजय सावळाराम पाटील ही मंडळी उपस्थित राहणार आहे.राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडणार असून यावेळी रंगाईनिर्मित जनकवी पी. सावळाराम यांच्या गीतावर आधारित धागा धागा अखंड विणू या... या सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असून रसिकांनी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठामपाने केले आहे.रसिकांना मेजवानीरविवारी जनकवी पी. सावळाराम स्मृती समारोह समारंभामध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.गडकरी रंगायतनमध्ये हा समारोह रंगणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवाणी ठाणेकर रसिकांना मिळणार आहे. 

टॅग्स :thaneठाणे