शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ठाण्यातील नौपाड्यात पी वन, पी टू पध्दतीने पार्कींगची सेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:32 IST

नौपाड्यातील पार्कींगची समस्या सोडविण्यासाठी अखेर १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर पी वन, पी टू अशा पध्दतीने पार्कींग सेवा सुरु करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतीन ठिकाणच्या स्पॉटवर पार्कींग सेवा सुरुसुचना हरकती मागविण्यास सुरवात

ठाणे - नौपाडा परिसरात कुठेही कसेही वाहन लावण्याची परंपरा कायम आहे. याठिकाणी वाहतुक सुरळीत करण्यासाठी अनेक बदलही यापूर्वी झालेले आहेत. परंतु तरी देखील येथील कोंडी फारशी सुटु शकलेली नाही. त्यामुळे आता रस्त्याच्या एका बाजूला ठराविक वेळेपर्यंत आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ठराविक वेळेपर्यंत पार्कींगची मुबा दिली जाण्याचे बदल वाहतुक पोलिसांमार्फत सुरु करण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्वावर हे बदल करण्यात आले असून वाहतुक पोलिसांना याबाबतच्या हरकती सुचना मागिवल्या आहेत.                नौपाड्यातील वाहतूकीसाठी गोखले मार्ग महत्वाचा मानला जातो. तसेच शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणून या मार्गाला ओळखले जाते. या मार्गावर मागील काही वर्षांपासून वाहनांचा भार वाढल्याने या भागातील राम मारुती रोड, मल्हार सिनेमा, शाहु मार्केट गजानन वडापाव रस्ता आदी ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. या मार्गावर दुचाकी वाहनांसाठी सम-विषम अशी पार्कींगची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली आहे. परंतु, व्यापारी तसेच ठाणे स्थानकातून रोज कामानिमित्त प्रवास करणारे अनेक प्रवासी येथील पार्कींगमध्ये दिवसभर वाहने उभी करतात. त्यामुळे याठिकाणी कामानिमित्त येणाºया अनेकांना वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने ते रस्त्यावर इतरत्र वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुक कोंडीत अधिक भर पडतांना दिसत आहे.दरम्यान ही कोंडी फोडण्यासाठी ठाणे पोलिसांच्या वाहतुक विभागाने येथील पार्कींग पी वन व पी टू अशी करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार अधिसुचना काढून तसा बदलही सुरु केला आहे. त्यानुसार सकाळी ७ ते ३ या वेळेत रस्त्याच्या उजव्या बाजुला तर दुपारी ३ ते रात्री १२ या वेळेत रस्त्याच्या डाव्या बाजुला वाहने उभी करण्यात येत आहेत.

  • या तीनही ठिकाणी कार, जीप, आदींसाठी पार्कींग समांतर असणार असून हलक्या वाहनांसाठीच ही पार्कींगची सुविधा उपलब्ध असेल असेही वाहतुक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हे बदल १५ दिवसासाठी प्रयोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून या संदर्भातील काही सुचना वा हरकती असल्यास त्या वाहतुक पोलिसांना कळविण्यात याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

*नौपाडा येथील गजानन महाराज चौक कडून समर्थ भाडांर दुकान, गोखले रोड दरम्यान राम मारुती रोडवर सकाळी ७ ते दुपारी ३ या कालावधीत डाव्याबाजूला आणि दुपारी ३ ते सकाळी ७ पर्यंत रत्याच्या उजव्या बाजूला पार्कींग करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहते.*राम मारुती क्रॉस रोड वरील शाह कलेक्शन दुकान ते नवलाई दुकानापर्यंत सकाळी ७ ते दुपारी ३ तसेच बँक आॅफ बडोदा ते कॉटन किंग दुकानापर्यंत दुपारी ३ ते सकाळी सात यावेळेत पार्कींगची सुविधा*गोखले रोडकडून सत्यम कलेक्शनकडे येणाऱ्या  महात्माफुले रोडवरील वूड लॅन्ड शुज, केंब्रीज दुकान, कुमार प्लॉस्टीक, दुपट्टा घर, विनी कलेक्शन, प्रसाद बंगला, मधू मिलिंद सोसायटी, झवेरी सोसायटी कडीब बाजूस सकाळी ७ ते दुपारी ३ आणि याच मार्गावरील दुसºया बाजूस दुपारी ३ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पार्कींगची मुबा देण्यात अली आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाParkingपार्किंग