शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विठुरायाच्या गजराने दुमदुमली ठाणेनगरी

By admin | Updated: July 5, 2017 06:24 IST

एकीकडे पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी अलोट गर्दी केली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकीकडे पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी अलोट गर्दी केली असताना दुसरीकडे ठाणे शहरातील पुरातन विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. विठुरायाच्या गजराने ठाणे शहर दुमदुमून गेले होते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामघोष सर्वांच्या मुखी होता. १४६५ साली स्थापन झालेले चेंदणी कोळीवाड्यातील व २०० वर्षांची परंपरा असलेल्या बाजारपेठेतील पुरातन विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्याचप्रमाणे शहरातील छोट्या भागांत असलेल्या विठ्ठल मंदिरातही जाऊन भाविकांनी दर्शन घेतले. एकादशीच्या दोन-तीन दिवस आधी शहरात विविध ठिकाणी विठ्ठलावर आधारीत भक्ती गीतांचा कार्यक्रम ऐकण्याचा अनुभव ठाणेकरांनी घेतला. जणू काही सभागृहात पंढरपूरचे वातावरण अनुभवत असल्याचे प्रत्येकाला वाटत होते. शहरातील शाळांमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळाशाळांमध्ये आदल्या दिवशी पंढरीची वारीच अवतरली होती. या शाळांतील विद्यार्थी संतनामदेव , संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वारकरी आणि विठ्ठल -रखुमाईच्या वेषात नटून थटून उपस्थित झाले होते. चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या पूर्व ठाण्यातील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात सकाळपासून श्रींच्या दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती. गेली चार वर्षे या मंदिराचे पुजारी म्हणून कार्यरत असलेले योगेश पाठक व त्यांची पत्नी जयश्री पाठक यांच्या हस्ते पहाटे पूजेसह अभिषेक करण्यांत आला. आषाढी एकादशीनिमित्त सुयश कला-क्र ीडा मंडळ, ठाणे यांच्यातर्फे मंदिराला फुलांची देखणी आरास केली होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत नाखवा, उपाध्यक्ष भगवान कोळी, सहकार्यवाह ऋ षिकेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.