शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष संवर्धनासाठी आता ठाणे पालिकेचे जिओ टॅग

By admin | Updated: July 8, 2015 00:01 IST

केवळ वृक्ष लागवडीवर लक्ष केंद्रीत न करता लावलेल्या प्रत्येक रोपट्याचे जतन होते की नाही याची माहिती मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने जिओ टॅग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : केवळ वृक्ष लागवडीवर लक्ष केंद्रीत न करता लावलेल्या प्रत्येक रोपट्याचे जतन होते की नाही याची माहिती मिळावी यासाठी ठाणे महापालिकेने जिओ टॅग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक वृक्ष या जिओ टॅगवर पाहता येणार आहे. अशा पध्दतीने जिओ टॅगवर वृक्षांची नोंद ठेवणारी ठाणे ही राज्यातील एकमेव महापालिका असेल. ठाणे महापालिकेने ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने २ वर्षात ५ लक्ष वृक्ष लागवड करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या शहरात वृक्ष लागवडीचे काम सुरु झाले आहे. यामध्ये पालिका पहिल्या वर्षी एक लाख आणि सामाजिक संस्था दीड अशा प्रकारे अडीच लाख वृक्षांची लागवड करणार आहे. दुसऱ्या वर्षीदेखील याच पद्धतीने काम केले जाणार आहे. परंतु, आता पालिकेने वृक्ष लागवडीचे काम शासकीय संस्थेस देण्याचे निश्चित केले असून त्यानुसार सध्या पालिका काम करीत आहे. मात्र, लावण्यात येणाऱ्या वृक्षांचे जतन, संवर्धन करण्यात यावे, लावलेल्या वृक्षांची वाढ किती झाली, ते जगले अथवा गायब झाले, त्याची माहिती या टॅगच्या माध्यमातून मिळणार आहे.या तंत्रज्ञानामुळे वृक्षांची अद्ययावत नोंद होणार असून व वृक्ष गणनेसाठी ती अत्यंत उपयोगी ठरणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वृक्षाची प्रजात, त्याची उंची, वय, घेर याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. सद्यस्थितीत आनंदनगर जकात नाका, हायवे येथे लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची नोंद प्रायोगिक तत्वावर केली असून, भविष्यात सर्व वृक्षांची नोंद जिओ टॅगिंगच्या सहाय्याने करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.