शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नववर्ष स्वागतयात्रेसाठी ठाणे महापालिकाही सज्ज

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 7, 2023 17:57 IST

२२ मार्च रोजी सकाळी सात वाजता भारतीय नववर्ष स्वागत यात्रा कौपीनेश्वर मंदिरातून निघणार आहे.

ठाणे : कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेत ठाणे महापालिकेचाही सहभाग असतो. त्या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी तयारीचा प्राथमिक आढावा घेतला. यात्रेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केल्या आहेत.

बुधवार, २२ मार्च रोजी सकाळी सात वाजता भारतीय नववर्ष स्वागत यात्रा कौपीनेश्वर मंदिरातून निघणार आहे. त्यापूर्वी स. ६.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन केले जाईल. ही स्वागत यात्रा जांभळी नाका, चिंतामणी चौक, दगडी शाळा, गजानन महाराज मंदिर, हरिनिवास सर्कल, गोखले रोड, राम मारुती रोड, मासुंदा तलाव आणि कौपीनेश्वर मंदिर या मार्गाने जाईल.ठाणे महापालिकेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिक्षण विभाग, उद्यान विभाग, परिवहन विभाग, पाणी पुरवठा विभाग, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि प्रदूषण नियंत्रण विभाग यांचे चित्ररथ स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत. स्वागतयात्रेसाठी मासुंदा तलाव परिसर, स्वागतयात्रेचा मार्ग स्वच्छ ठेवण्याच्या सूचना संदीप माळवी यांनी आढावा बैठकीत दिली. या मार्गावरील अतिक्रमणे, फेरिवाले हटवण्यास अतिक्रमण विभागास सांगण्यात आले.

मासुंदा तलाव परिसर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आदी भागात रोषणाईच्या सूचना विद्युत विभागास देण्यात आल्या. तर, स्वागतयात्रे दरम्यान, सर्व सुविधांसह वाहन तैनात करण्यास अग्निशमन विभागास सांगण्यात आले आहे. कडक उन्हाळा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने विशेष काळजी घ्यावी, असे माळवी यांनी स्पष्ट केले.अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीस, नगर अभियंता प्रकाश सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, प्रशांत रोडे, अनघा कदम, उप नगर अभियंता शुभांगी केसवानी, अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरिश झळके, स्वागतयात्रेच्या आयोजन समितीचे सदस्य संजीव ब्रम्हे, कुमार जयवंत, भरत अनिखिंडी, प्रसाद दाते आदी उपस्थित होते.

या यात्रेच्या निमित्ताने, रविवार १९ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळत ठाण्यातील विविध नृत्यसंस्थाच्या विद्यार्थीनी व त्यांच्या नृत्यगुरू यांचा नृत्यधारा हा कार्यक्रम होईल. २० मार्च रोजी गंधार भालेराव यांचे बासरीवादन, पं. मुकुंदराज देव यांच्या शिष्य परिवाराचे तबलावादन आणि पं. शैलेश भागवत यांचे सनईवादन होईल. २१ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा. गीता पठण, रुद्र व शिवमहिन्म स्त्रोत पठण होईल. सायं. ८.३० ते १० या वेळेत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे सगळे कार्यक्रम कौपीनेश्वर मंदिराच्या प्रांगणात होतील. २१ मार्च रोजी, पूर्वसंध्येला मासुंदा तलाव परिसरात दीपोत्सव होईल.

 

टॅग्स :thaneठाणे