शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या पाणीपट्टी विभागाने केली १०३ कोटींची वसुली, ३८५ नळ संयोजन खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 16:10 IST

ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सध्यातरी चांगली वसुली केली आहे. तर ३८५ नळ संयोजने खंडीत केली आहेत. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देमाजिवड्यातून १२.६४ कोटींची विक्रमी वसुलीकोलशेत भागातून १७.५७ लाखांची वसुली

ठाणे - एकीकडे मालमत्ता कराची वसुली नियमितपणे होत असतांना दुसरीकडे पाणी कराची वसुली मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बऱ्यापैकी चांगली झाली आहे. ही वसुली वाढविण्यासाठी नळ संयोजन खंडीत करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार १० मार्चपर्यंत पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या १३५ कोटींच्या टारगेटपैकी १०३ कोटींची वसुली केली आहे. तर ३८५ च्या आसपास नळसंयोजन खंडीत करण्यात आले आहेत.           एकीकडे मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी मालमत्ता कर विभागाची तारेवरची कसरत सुरु आहे. दुसरीकडे पाणी पुरवठ्याची वसुली वाढविण्यासाठीसुध्दा आता युध्द पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत. परंतु या विभागातील कर्मचाऱ्यांनासुध्दा लोकसभा निवडणुकीचे काम लागल्याने वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी यंदा १० मार्च पर्यंत १०३ कोटींची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांकडून ९० कोटी, व्यावसायिक ग्राहकांकडून १०.३१ कोटी आणि इतर २.३० कोटी अशी एकूण वसुली करण्यात आली आहे. मागील वर्षी ३१ मार्चपर्यंत १२२ कोटींची वसुली झाली होती.                   दरम्यान वसुली करण्यात आलेल्या विभागात माजिवडा अव्वल ठरला असून येथून १२.६४ कोटींची वसुली झाली आहे. त्या खोलाखाल वर्तकनगर भागातून १२.१४ कोटी, नौपाडा ८.८५ कोटी, उथळसर ८.६२ कोटी, लोकमान्य नगर ८.१२ कोटी, चितळसर मानपाडा ६.४४ कोटी, वागळे ७.८८ कोटी, कळवा ४.२८ कोटी, दिवा ३.९७, शिळ १.८२, मुंब्रा ४.२४, कौसा ३.१९, विटावा २.०१, कोपरी ३.३१, खारेगाव ३.४३, बाळकुम २.१८, कोलशेत १७ लाख ५७ हजार अशा प्रकारे वसुली करण्यात आली आहे. तर थकबाकी असलेल्या ३८५ च्या आसपास ग्राहकांचे नळ संयोजन खंडीत करण्यात आले आहे. त्यांच्याकडे दिड कोटींच्या आसपास थकबाकी होती अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त