शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा रुग्णालयाच्या मीटर बॉक्सला आग; सुदैवाने ३ महिलांसह ३ बालके बचावले

By अजित मांडके | Updated: July 19, 2023 09:40 IST

शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

ठाणे - कासारवडवली येथील ठाणे महापालिका रुग्णालयातील महावितरणच्या मीटर बॉक्स रूममध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून यावेळी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या प्रस्तुतीगृहमध्ये तीन महिलांसह तीन बालके होती. त्यांना तातडीने हलविले असून ते सुखरूप आहेत. सुदैवाने ही आग एकाच मीटर बॉक्सला लागली होती. ती पसरली नसल्याने अन्य मीटर बॉक्सचे नुकसान झाले नाही. 

घोडबंदर रोड,कासारवडवली येथील रोझा गार्डेनिया येथे तळ अधिक तीन मजली इमारतीत ठामपा रुग्णालय आहे. याच रुग्णालयाच्या तळ मजल्यावर असलेल्या मीटर बॉक्स रूममध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा सुरक्षारक्षक, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. घटनास्थळी दाखल होताच महावितरण विद्युत कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना मीटर बॉक्स रूम मध्ये लागलेल्या आगीवर सुमारे अर्ध्यातासात नियंत्रण मिळविण्यात यश आले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

असे आहे रुग्णालय तळ मजल्यावर ओपीडी असून त्यावेळी कोणीही रुग्ण नव्हते. त्याचप्रमाणे दुसरा मजला रिकामी असून तिसरा मजल्यावर डायलेसिस विभाग आहे. मात्र या घटनेच्या वेळी तेथे कोणीही रुग्ण नव्हते. पण, दुसऱ्या मजल्यावर प्रसूतिगृह असून तेथे तीन महिला व तीन बालके त्यावेळी होती. त्यांना तातडीने हलविले असून ते सुखरूप आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या अधिकाऱ्यांनी दिली.