ठाणे - पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्यात वीरमरण आलेल्या महाराष्ट्रातील त्या दोन सीआरपीएफच्या जवानांना सोमवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या महासभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी या दोन जवानांच्या कुटुंबियांसाठी नगरसेवकांनी आपले एक महिन्यांचे मानधन देण्याचा ठराव करण्यात आला.मागील आठवड्यात पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील संजयसिंह दिक्षित राजपुत आणि नितिन राठोड या दोन जवानांचासुध्दा सहभाग आहे.शहीद झालेल्या जवानांसाठी विविध माध्यमातून श्रध्दांजली अर्पण केली जात आहे. परंतु केवळ श्रध्दांजली अर्पण करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याची गरज असल्याचे मत सोमवारी झालेल्या महासभेत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. त्यामुळे एक महिन्यांचा नगरसेवक निधी त्यांच्या कुटुंबियांसाठी देण्याचा ठराव त्यांनी मांडला. त्याला विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी अनुमोदन दिले.ठाणे महापालिकेत १३१ आणि चार स्विकृत असे मिळून १३५ नगरसेवक आहेत. प्रत्येक नगरसेवकाला १५ हजारांचे मानधन दिले जाते. त्यानुसार आता शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवांनाच्या कुटुंबियांना एकूण २० लाखांच्या आसपास मदत मिळणार आहे. नगरसेवकांनी केलेल्या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान शहीद झालेल्या सर्वच जवानांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करुन महासभा संपूर्ण दिवसासाठी तहकुब करण्यात आली.
महाराष्ट्रातील त्या दोन शहीद जवानांच्या कुटुंबियांना ठाणे महापालिकेचे नगरसेवक देणार एक महिन्यांचे मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:15 IST
पुलवामा येथे शहीद झालेल्या महाराष्ट्रातील त्या दोन जवानांना ठाणे महापालिकेतील नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार याची तत्काळ अंमलबजावणी सुध्दा केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील त्या दोन शहीद जवानांच्या कुटुंबियांना ठाणे महापालिकेचे नगरसेवक देणार एक महिन्यांचे मानधन
ठळक मुद्देमहासभेत झाला ठरावलवकरच होणार अंमलबजावणी