शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

ठाण्यात नगरसेवकांची चांदी !

By admin | Updated: March 23, 2016 02:16 IST

ठाणे महापालिका आयुक्तांनी २०१६-१७ साठी सादर केलेल्या २५४९.८२ कोटींच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने १०९.५० कोटींची वाढ सुचवली आहे.

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांनी २०१६-१७ साठी सादर केलेल्या २५४९.८२ कोटींच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने १०९.५० कोटींची वाढ सुचवली आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रभाग सुधारणा निधीसाठी एका पैशाचीही तरतूद नव्हती. मात्र निवडणूक वर्षाचा विचार करता स्थायीने नगरसेवक निधीसाठी ३१ कोटी ६१ लाख आणि प्रभाग सुधारणा निधीसाठी ४०.५० कोटींची भरीव तरतूद केली आहे. यामुळे प्रत्येक नगरसेवकाला नगरसेवक निधी म्हणून २३ लाख ४१ हजार आणि प्रभाग सुधारणा निधी म्हणून ३० लाख उपलब्ध होणार आहेत. हा २६५९.३२ कोटींचा सुधारित अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांनी महासभेला सादर केला. स्थायी समितीने सादर केलेल्या सुधारित अर्थसंकल्पात शहरविकास, जाहिरात विभाग आदींसह नगरसेवकांच्या प्रभाग सुधारणा निधीतही वाढ सुचवून हा अर्थसंकल्प १०९.५० कोटींने वाढविण्यात आला आहे. स्थायीने शहरविकास विभागात ७० कोटींची वाढ सुचवितांना ५८५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. तर अग्निशमन दलासाठी १० कोटींची वाढ सुचवितांना ८९ कोटींचे उत्पन्न, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १५ कोटींची वाढ सुचवितांना ११५ कोटींचे उत्पन्न, पुनर्प्रक्रि या केलेले पाणी विक्र ी १० कोटी, अतिक्रमण विभाग २.९० कोटी, स्थावर मालमत्ता विभाग १ कोटी, आरोग्य विभाग ५० लाख, क्रीडा प्रेक्षागृहासाठी १० लाखांची वाढ सुचवली आहे. पाण्याच्या पुर्नप्रक्रियेपासून निर्माण होणाऱ्या पाणी विक्रीतून १० कोटी, शहीद तुकाराम ओंबाळे मिनी स्टेडियममध्ये पीपीपी तत्वावर उपहारगृह व व्यायामशाळा तयार करण्याचे प्रस्तावित असून सचिन तेंडूलकर क्रीडा प्रेक्षागृह सायंकाळी ६ ते १० या वेळेत लग्नकार्यासाठी भाडेतत्वावर देण्याचे सुचवण्यात आले आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या मुळ अर्थसंकल्पात नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधीसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नव्हती. परंतु नगरसेवक निधी २३ लाख ४१ हजार आणि प्रभाग सुधारणा निधीसाठी प्रत्येक सदस्यासाठी ३० लाखांची तरतुद करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर कळवा रुग्णालय, वाडीया हॉस्पिटल, कोपरी हॉस्पिटल येथे गरीब वर्गातील रुग्णांना डायबेटीसवरील औषधे, इन्शुलीन व मोफत उपचार पुरविण्यासाठी एक कोटी ५० लाखांची तरतुद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी करण्यात आलेल्या २ कोटींच्या तरतुदीमध्ये ५० लाखांची वाढीव तरतुद, तसेच यापुढे सुरक्षित शाळा प्रकल्प योजनेला आर्यभट्ट सुरक्षित शाळा प्रकल्प असे नाव सुचविण्यात आले आहे. बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या अपघात विम्याच्या १५ लाखांच्या तरतुदीत पाच लाखांची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहेत. जनपथ नुतनीकरणासाठी एक कोटींची वाढीव तरतूद, धर्मवीर आनंद दिघे उद्यानासाठी २५ लाख, पारसिकनगर येथील जॉगिंग ट्रॅकसाठी ५० लाख, जय भवानी स्मशानभूमीसाठी एक कोटी व खर्डी गावातील स्मशानभुमीसाठी ५० लाखांची वाढीव तरतुद, देसाई गावातील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी समाज मंदिरासाठी ५० लाख, दिवा फायर स्टेशनसाठी १ कोटी, आरक्षित भुखंड विकसित करण्यासाठी वाढीव ५ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. मनोरुग्णालयातील क्रीडा संकुलासाठी १ कोटींची वाढीव तरतुद, मासुंदा तलावासाठी १ कोटी,शौचालय दुरुस्तीसाठी ३ कोटींवरुन साडेसात कोटींची तरतुद, सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी ३ कोटींवरुन आठ कोटींची तरतुद, गटार बांधण्यासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आह.नव्या योजना : दिवंगत मीनाताई ठाकरे प्रशिक्षण योजना - बहुविकलांग विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही मुले मोठी झाल्यानंतर स्वत:च्या पायावर उभे राहून उदरनिर्वाह करु शकत नाहीत. या मुलांना उर्वरित आयुष्य जगण्यासाठी त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.आनंद दिघे मोफत प्रवास योजनामहापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती लक्षात घेता, त्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने धर्मवीर आनंद दिघे मोफत प्रवास योजना जाहीर करण्यात आली असून यासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पाणी नियोजनासाठी सल्लागार पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उपलब्ध नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांचा शोध घेऊन तेथील पाणी वापरात आणण्यासाठी व विविध उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची समिती नेमून त्यांनी सुचविलेल्या पर्यायांवर विचार करण्यासाठी २५ लाखांची तरतूद.ओव्हरटाइम वाढला : जादा काम भत्याच्या मर्यादेत एक हजाराने वाढ करण्यात आली आहे. पदाधिकारी, आयुक्त व अतिरिक्त आयुक्त १ व २च्या आरक्षक व वाहनचालकांच्या जादा कामाच्या भत्यामध्ये २ हजाराने वाढ सुचविण्यात आली आहे. त्यामुळे चारऐवजी पाच आणि ८ हजार ५०० ऐवजी १०५०० रूपयांचा जादा भत्ता मिळणार आहे.