शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेचे स्टारग्रेड अ‍ॅप आता नव्या दमात ठाणेकरांच्या सेवेसाठी रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:08 IST

ठाणे महापालिकेचे खड्यांच्या तक्रारींसाठीचे अ‍ॅप आता नव्या स्वरुपात मंगळवार पासून सुरु होणार आहे. यामध्ये आता केवळ खड्यांच्याच नाही तर अग्निशमन, प्रदुषण, आपत्तकालीन, उद्यान, वृक्ष प्राधिकरण आदी विभागांच्या देखील तक्रारी करता येणार आहेत.

ठळक मुद्देइतर विभागांचा देखील अंतर्भावतक्रारींची घेतली जाणार तत्काळ दखल

ठाणे - रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु करण्यात आलेल्या स्टार ग्रेड अ‍ॅप बंद होते. परंतु आता ते नव्या स्वरुपात, नव्या दमात ठाणेकरांच्या सेवेसाठी मंगळवार पासून रुजु होणार आहे. या अ‍ॅपवर केवळ खड्यांच्याच तक्रारी करता येणार नसून, शौचालय, गार्डन, सार्वजनिक बांधकाम खात्याचे इतर विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, अग्निशनम विभाग आदींसह इतर महत्वाच्या विभागांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एका क्लिकवर ठाणेकरांना आता आपल्या समस्या सोडविण्याची संधी महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे.                                      पावसाळ्यात शहरात किती खड्डे पडले, कोणत्या भागात पडले आणि हे खड्डे बुजविण्यासाठी कशा प्रकारच्या हालचाली झाल्या, या बाबत पालिकेने मागील तीन वर्षापूर्वी स्टार ग्रेड नावाचे अ‍ॅप सुरु केले होते. अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींवर तत्काळ संबधींत विभागाकडे दिल्या जात होत्या. तसेच याची कारवाई कोणत्या टप्यात आहे याची माहिती देखील तक्रारदाराला दिली जात होती. त्यानंतर खड्डा बुजल्यावर देखील त्याचा फोटा अथवा माहिती म्हणजेच तुमच्या तक्रारीवर काम पूर्ण झालेले असा मेसेज पाठविला जात होता. त्यामुळे शहरातील खड्यांवर पालिकेने या अ‍ॅपच्या माध्यमातून नियंत्रण आणल्याचे दिसून आले होते. या अ‍ॅपसाठी पालिकेने तब्बल ४५ लाखांचा खर्च केला होता. परंतु संबधींत एजेन्सीचा ठेका संपुष्टात आल्याने हे अ‍ॅप बंद मागील काही महिने बंदच होते. परंतु आता नव्या दमात, नव्या स्वरुपात पालिकेने हे अ‍ॅप सुरु केले आहे. आता याचे अपडेट व्हर्जन ठाणेकरांच्या भेटीला मंगळवार पासून येणार आहे.                      या अ‍ॅपवर आता केवळ खड्यांच्याच नाही तर, शौचालयाचे दरवाजे तुटले, ओव्हरफ्लो झाले असेल, लाईट, पाण्याची सुविधा नाही, आदींच्या देखील तक्रारी करता येणार आहेत. शिवाय अग्निशमन विभाग, महत्वाचे म्हणजे वृक्ष प्राधिकरण विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आदींसह इतर महत्वाच्या विभागांचा देखील यात आता समावेश करण्यात आला आहे. आधी तक्रार केल्यानंतर, संबधींत विभागाकडे ती उशिराने पोहतच होती. परंतु आता तुम्ही या अ‍ॅपवर एखादी तक्रार केली तर ती थेट त्याच विभागाच्या संबधींत कार्यकारी अभियंत्याकडे जाणार आहे. त्यामुळे त्यावर तोडगा देखील तत्काळ निघणार आहे. हे अ‍ॅप केवळ खड्यांसाठी होते, त्यामुळे आता इतर विभाग देखील त्यात समाविष्ट करण्यात आल्याने त्या विभागांच्या कशा, कोणत्या स्वरुपाच्या तक्रारी येणार याचा देखील अभ्यास या माध्यमातून केला जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त