शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

ठाणे महापालिकेच्या महासभेत कचरा उचलणे बंद केल्याच्या मुद्यावरुन गदारोळ, आधी जनजागृती करा मगच कचरा उचलणे बंद करा, महापौरांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 15:17 IST

शहरातील विविध आस्थापना आणि सोसायटींनी १५ डिसेंबर पर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु न केल्याने अखेर पालिकेने काही सोसायटींचा कचरा उचलणे बंद केले. त्याचे पडसाद महासभेत उमटले असून जोपर्यंत जनजागृती केली जात नाही, तोपर्यंत कचरा उचलणे बंद करु नका असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ठळक मुद्दे१५ डिसेंबर नंतर काही सोसायटींचा कचरा उचलण्याची प्रक्रिया पालिकेने केली बंदमहासभेत कचऱ्याच्या मुद्यावरुन सर्वपक्षीय नगरसेवकांचा हल्लाबोल

ठाणे - ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त निर्माण होत असेल, तसेच ज्या सोसायटी पाच हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या असतील त्या सोसायटींनी त्यांच्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशा आशयाच्या नोटीसा पालिकेने बजावण्यास सुरवात केली आहे. शिवाज जे कचऱ्याची विल्हेवाट लावणार नाहीत, त्यांचा कचरा उललला जाणार नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार पालिकेने या डेडलाईन नंतर काही सोसायट्यांचा कचरा उचलणे बंद केल्याचा मुद्दा बुधवारी झालेल्या महासभेत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. आधी सोसायटींना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षण द्यावे त्यानंतर कचरा उचलणे बंद करावे अशी मागणीही सदस्यांनी केली. त्यानुसार महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आधी जनजागृती, प्रशिक्षण द्या मगच कचरा उचलणे बंद करा, तोपर्यंत कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरुच ठेवावी असे आदेश संबधींत विभागाला दिले.महासभेत भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी या मुद्याला हात घालत, पालिकेने पाठविलेली नोटीस सभागृहाला सादर केली. परंतु काही सोसायट्या छोट्या असल्याने त्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावता येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नोटीस बजावण्यापूर्वी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षण, जनजागृती करणे अपेक्षित होते असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्याच अनुषंगाने इतर सदस्यांनी देखील स्वच्छ शहर म्हणून पालिका दावा करीत असली तरी केंद्राने केलेल्या सर्व्हेत आपण १७ वरुन ११६ क्रमांकावर कसे गेलो असा सवाल नारायण पवार यांनी उपस्थित केला. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करुन दिला जात असला तरी तो घंटागाडीत एकत्रितच टाकला जात असल्याचा मुद्दा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित केला. महापालिकेला अद्यापही स्वत:चे हक्काचे डम्पींग ग्राऊंड मिळविता आलेले नाही, असे असतांना ठाणेकरांवर ही कुºहाड कशासाठी असा सवालही काही सदस्यांनी उपस्थित केला.

  • डायघरला कोणत्याही परिस्थितीत डम्पींग होऊ देणार नाही...

मागील १० वर्षापासून ठाणे महापालिकेच्या वतीने डायघर येथे डम्पींग सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे तेथे आजतागायत डम्पीग सुरु झालेले नाही. हाच डम्पींगचा मुद्दा महासभेत उपस्थित झाला असता, दिव्यातील राष्टÑवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी यापूर्वी जो विरोध डम्पींगसाठी होता, तो विरोध आजही कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी डम्पींग होऊ देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, आपला प्रभाग स्वच्छ राखणाऱ्या टॉप टेन नगरसेवकांना प्रत्येकी अतिरिक्त २५ लाखांचा निधी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. परंतु ज्या भागात सोसायटी आहेत, त्यांनाच ते मिळणार आहेत, आमच्या सारख्या झोपडपट्टी भागाला या टॉप टेनमध्ये संधी असणार का? असा सवाल राष्टवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी उपस्थित केला. एकूणच आधी जनजागृती, प्रशिक्षण, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कशा प्रकारच्या यंत्रणा आहेत, याची माहिती प्रदर्शन भरविण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली. प्रशासनाने मात्र आम्ही कोणत्याही सोसयटीचा कचरा उचलणे बंद केले नसल्याचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील महिन्यात या संदर्भातील प्रदर्शन लावण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु जो पर्यंत जनजागृती, प्रदर्शन आणि प्रशिक्षण दिले जात नाही, तो पर्यंत कचरा उचलणे बंद करु नका असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त