शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

ठाणे महापालिकेच्या आठ प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध निश्चित, दिव्यात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 17:44 IST

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीपैकी आठ प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. केवळ दिवा प्रभाग समितीसाठी शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी सामना रंगणार आहे. असे असले तरी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीने पुन्हा आधीच्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेने वागळेत तर कळव्यातराष्ट्रवादीने दिला नवा चेहरादिव्यात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी लढत

ठाणे - प्रभाग समिती अध्यक्षांना अतिशय कमी कार्यकाळ मिळाल्याने पुन्हा संधी मिळावी अशी मागणी मागील काही दिवसापासून जोर धरु लागली होती. त्यानुसार सर्वच पक्षांनी पुन्हा त्याच नगरसेवकांना प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी संधी दिल्याचे दिसून आले आहे. बुधवारी अर्ज भरण्याच्या दिवशी पाच प्रभाग समितीत शिवसेनेने तर प्रत्येकी एका प्रभाग समितीत राष्ट्रवादी आणि भाजपाने त्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. तर कळव्याला मात्र राष्ट्रवादीने आणि वागळेत शिवसेनेने नवा चेहरा दिला आहे. तर दिवा प्रभाग समितीसाठी प्रत्येकी दोन अर्ज आल्याने त्याठिकाणी निवडणुक निश्चित मानली जात असून उर्वरीत ठिकाणची निवड ही बिनविरोध मानली जात आहे.               ठाणे महापालिकेत एक हाती सत्ता स्थापन केल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेला स्थायी समितीसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळेच इतर समित्यांच्या देखील निवडणुका रखडल्या होत्या. परंतु नऊ महिन्यानंतर प्रभाग समितीच्या निवडणुका घेतल्या गेल्या. त्यानंतर अवघे पाच ते सहा महिनेच काम करण्याची संधी या प्रभाग समिती अध्यक्षांना मिळाल्याने पुन्हा आम्हाला संधी द्यावी अशी मागणी सर्वच पक्षातील प्रभाग अध्यक्षांनी केली होती. अखेर त्यांच्या मागणीचा विचार करुन पक्षाने देखील त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला असून त्यांना संधी देण्याचे निश्चित केले. त्यानुसार उथळसर प्रभाग समितीत नंदा पाटील (भाजपा), वागळेत मात्र शिवसेनेने या खेपेला संध्या मोरे यांना संधी दिली आहे. माजिवडा मानपाडा सिधार्थ ओवळेकर, वर्तकनगर - रागीणी बैरीशेट्टी, लोकमान्य सावरकर नगर - कांचन चिंदरकर तर कळव्यात राष्ट्रवादीने महेश साळवींच्या जागी प्रकाश बर्डे यांना संधी दिली आहे. मुंब्य्रात मात्र अनिता किणे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. नव्याने तयार झालेल्या दिवा प्रभाग समितीत शैलेश पाटील यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीने देखील अर्ज भरल्याने या प्रभाग समितीत निवडणुक निश्चित मानली जात आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या सुरमे नादीरा यासिन यांनी अर्ज भरला आहे.दरम्यान मागील वेळेस नौपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनाला नऊ तर भाजपाला सात मते पडली होती. त्यामुळे भाजपाने आता या प्रभाग समितीत अर्ज भरला नाही. त्यानुसार येथे आता शिवसेनेच्या वतीने शर्मिला गायकवाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यानुसार आता शिवसेनेच्या वाटेला सहा प्रभाग समिती, राष्ट्रवादीच्या वाटेला दोन आणि भाजपाच्या वाटेला एक प्रभाग समिती आली आहे. एकूणच शिवसेनेचा पुन्हा प्रभाग समितीवर वरचष्मा दिसून आला आहे. तर राष्ट्रवादीने कळवा, मुंब्रा राखला आहे. परंतु दिव्यात होणारी लढत ही तशी नगण्य मानली जात आहे. याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जास्तीचे असल्याने ही समिती देखील शिवसेनेच्या वाटेला जाईल हे पक्क मानले जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाElectionनिवडणूक