शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेची वागळे भागात ३५० बांधकामांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:58 IST

ठाणे महापालिकेने सोमवारी सकाळी वागळे इस्टेट भागात आपला मोर्चा वळविला होता. त्यानुसार कामगार रुग्णालय ते ज्ञानेश्वरनगर पर्यंतच्या ३५० बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. यामध्ये २५० व्यावसायिक १०० निवासी बांधकामांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे१०० निवासी बांधकामधारकांचे रेंटलच्या घरात पुनर्वसनव्यावासायिक बाधीतांचे बाजूलाच केले जाणार पुनर्वसन

ठाणे - घोडंबदर भागातील बांधकामांवर कारवाई केल्यानंतर सोमवारी ठाणे महापालिकेने आपला मोर्चा वागळे इस्टेट भागात वळविला. यावेळी या भागातील कामगार रुग्णालय नाका ते ज्ञानेश्वारनगर पर्यंतच्या मार्गावरील ३५० बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कारवाईमुळे येथील २४ मीटरचा रस्ता आता ३० मीटर होणार आहे.             ठाणे महापालिकेच्या वतीने नवीन वर्षात पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार घोडबंदर भागात १२७ बांधकामांवर हातोडा टाकल्यानंतर सोमवारी महापालिकेने वागळे पट्यात रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली. बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेची पथके वागळे इस्टेटमधील कामगार नाक्यावर सकाळी पोहचली. या पथकांनी बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू करताच अनेकांनी दुकानांमधील साहित्य इतरत्र हलविण्यास सुरूवात केली. काही जणांनी कामगार रु ग्णालय वसाहतीच्या आवारातील मोकळ्या जागेत साहित्य नेऊन ठेवले. साहित्याची वाहतूक करताना अनेकांची दमछाक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर कामगार रु ग्णालय नाका ते ज्ञानेश्वारनगरपर्यंतच्या मार्गावरील ३५० बांधकामे पथकाने जमीनदोस्त केली. त्यामध्ये २५० व्यावसायिक बांधकामे तर १०० निवासी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने ही बांधकामे तोडण्यात आली. आयुक्त जयस्वाल यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईच्या पाश्र्वभूमीवर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाई पाहण्यासाठी परिसरात अनेकांनी मोठी गर्दी केली होती. कामगार रु ग्णालय भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील रस्ता ३० मीटर रु ंद करण्यात येणार आहे. या रुंदीकरणासाठी येथील बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला. ३० मीटर रस्ता रुंद केल्यानंतर त्या लगतच २५० व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यातही कोणाचे पुनर्वसन राहिले तर त्याचे अन्य ठिकाणी पुनर्वसन केले जाईल अशी हमी यावेळी पालिकेने दिली. तसेच १०० निवासी बांधकामांतील कुटूंबांचे भाडे तत्वावरील योजनेच्या घरांमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले असून त्यांना बीएसयुपीची घरे दिली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त