शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेत ३९ नगरसेवक हिस्ट्रीशिटर

By admin | Updated: February 27, 2017 04:26 IST

महानगरपालिका निवडणुकीत ठाणेकरांनी तब्बल ३९ गुन्हेगारांना पुन्हा पालिकेत धाडले

ठाणे : महानगरपालिका निवडणुकीत ठाणेकरांनी तब्बल ३९ गुन्हेगारांना पुन्हा पालिकेत धाडले असून ८८ व्यावासायिक, नोकरी करणारे ३ आणि ४४ गृहीणांनादेखील पालिकेत बसण्याचा मान मिळाला आहे. त्यातही ४० ते ५० वयोगटातील सर्वाधिक ६४ नगरसेवक दाखल झाले असून ज्येष्ठ नगरसेवकाचा मान भाजपाच्या अशोक राऊळ यांना मिळाला आहे. तर ८२ कोट्यधीश नगरसेवकही सभागृहात बसणार आहेत.२४ नगरसेवक हे पदवी संपादन केलेले असून बारावीपर्यंत शिक्षण झालेले २६ आणि १० वीपर्यंत शिक्षण घेतलेले २१ नगरसेवक निवडून आले आहेत. तर चवथी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ४५ नगरसेवकांनी पालिकेची पायरी चढली आहे. उमेदवार न आवडल्याने तब्बल ८१ हजार ठाणेकरांनी ‘नोटा’ला पसंती दिली. असे असले तरी ठाणेकरांनी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे नगरसेवकदेखील पुन्हा निवडून दिले आहेत. पालिका निवडणुकीत ८०५ उमेदवारांपैकी वेगवेगळ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले १३१ उमेदवार मैदानात उतरले होते. त्यातील ३९ निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे २०, राष्ट्रवादीचे १२, भाजपाचे ६ आणि काँग्रेसच्या १ नगरसेवकाचा समावेश आहे. तर तरुण उमेदवारांना पसंती मिळेल अशी आशा या निवडणुकीत होती. परंतु तरुण नगरसेवकांचे प्रमाण हे १४ एवढेच असून यामध्ये २१ वर्षाच्या तरुण नगरेसेविकेचा मान हा प्रभाग क्रमांक २४ ब मधील प्रियंका पाटील यांना मिळाला आहे. तर ज्येष्ठ नगरसेवकाचा मान हा प्रभाग क्रमांक १२ ब चे नगरसेवक अशोक राऊळ यांना मिळाला आहे. २१ ते ३० वयोगटातील १४, ३१ ते ४० मधील ३१, ४० ते ५० मधील ६४, ५० ते ६० मधील २० आणि ६० वयोगटापुढील २ नगरसेवक पालिकेत निवडून गेले आहेत. नवनियुक्त नगरसेवकांपैकी ७५ टक्के नगरसेवक हे व्यावसायिक असल्याने सत्तेच्या चाव्या यंदा त्यांच्याच हातात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेच्या ६७ पैकी ५५ नगरसेवक हे व्यावसायिक असून राष्ट्रवादीचे १८, भाजपाचे १३ आणि कॉंग्रेस आणि अपक्ष असा प्रत्येकी १ नगरसेवक हा व्यावसायिक आहे. यामध्येही ८८ व्यावसायिक, २ शेती व्यवसाय, ३ नोकरी आणि ४४ गृहीणी आहेत. महापालिकेत उच्च शिक्षितांचे प्रमाण कमी असले तरी किमान वाचता लिहिता येईल असे नगरसेवक ठाणेकरांनी महापालिकेत धाडले आहेत. यामध्ये चवथी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेले ४५, दहावी उत्तीर्ण २१, बारावी उत्तीर्ण २६, पदवीपेक्षा कमी ०३, पदवीधर २४, पदव्युत्तर पदवीप्राप्त ०३, टेक्निकल शिक्षण घेतलेले ०३, इंजिनिअर ०१ आणि काहीच शिक्षण नसलेले १ असे नगरसेवक पालिकेत निवडून आले आहेत. (प्रतिनिधी)