शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका करणार रुग्ण कल्याण समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:55 IST

ठाणे महापालिका आता रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने, रुग्ण कल्याण समितीची स्थापना करणार आहे. या संदर्भात प्रस्ताव येत्या शुक्रवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देअध्यक्ष चार सदस्य आणि सचिवाचा असणार समावेशप्राथमिक आरोग्य आणि नागरी सामुदायिक केंद्रावर असणार या समित्या

ठाणे - राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका देखील आता रुग्ण कल्याण समिती स्थापन करणार आहे. त्यानुसार या समितीवर सदस्यांची नावे निर्देशीत करण्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.       ठाणे महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान राबविण्यात येत असून त्या संदर्भातील प्रशासकीय व वित्तीय ठराव मंजुर झाला आहे. तसेच या कार्यक्रमाची रुपरेषा महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने यापूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आली आहे. या अभियानाची अमंलबजावणी करण्यासाठी २०१७-१८ या वर्षासाठी शासनाकडून प्रकल्प अमंलबजावणी आराखडा मंजुर करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र स्तरावर केंद्र शासनाच्या सुचनेनुसार रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून नागरी भागातील जनतेला आरोग्य विषयीच्या सेवा सुविधा उपलब्ध करुन देणे हा या समितीचा मुख्य उद्देश असणार आहे. या समितीच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्यास, आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यास तसेच रुग्णालयीन स्वच्छता राखण्यास मदत होते. त्यानुसार राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान स्तरावर रुग्ण कल्याण समितीची धर्मादाय आयुक्त अंतर्गत सोसायटी रजिस्टर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र समितीमध्ये अध्यक्ष, चार सदस्य, सदस्य सचिव यांची नेमणूक केली जाणार आहे. तर नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र कार्यकारी समितीमध्ये देखील अध्यक्ष, चार सदस्य आणि एका सदस्य सचिवाची नेमणूक केली जाणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणेcommissionerआयुक्त