शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सामन्यासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे महापालिकेने सतर्कतेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे महापालिकेने सतर्कतेच्या दृष्टिकोनातून काही कुलूपबंद केलेले कोविड सेंटर पुन्हा चालू करण्याची लगबग सुरू केली आहे. या ठिकाणी साफसफाई करून ते पुन्हा कोरोना रुग्णांसाठी सज्ज करण्यात येत आहे. तर आणखी एक नवे कोविड सेंटर येत्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांत शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या प्रत्यक्ष रुग्णांची संख्याही वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. त्यामुळे महापालिकेने टप्प्याटप्प्याने कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वागळे, कळवा, मुंब्रा येथील कोविड सेंटर बंद केले. तर भाईंदरपाडा येथील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तयार केलेले सेंटरही बंद केले होते. परंतु, नव्या वर्षात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. नागरिकांकडून नियमांचे होणारे उल्लंघन, मास्क न वापरणे, गर्दी करणे यामुळेदेखील रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

यापूर्वी कोविड सेंटरमध्ये चार हजारांहून अधिक बेड शिल्लक होते. परंतु, ते बंद केल्याने बेडची संख्याही कमी झाली होती. सध्याच्या घडीला ११ ठिकाणी कोविड सेंटर सुरू आहेत. यातील काही सेंटर बंद होते. तेदेखील आता सुरू करण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

कोरोनाचे एकूण रुग्ण -६१२०२

बरे झालेले रुग्ण - ५८६०८

कोरोनाचे बळी - १३२६

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - १२६८

ग्लोबल कोविड सेंटरमध्ये ६५३ रुग्णांवर उपचार

महापालिकेच्या ग्लोबल इॅम्पॅक्ट हब येथील कोविड सेंटरमध्ये सध्याच्या घडीला १०७४ बेड उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी सध्या ६५३ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती महापालिकेने दिली. यामध्ये आयसीयूमध्ये १३२ रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरात ११ कोविड सेंटर सुरू

शहरात यापूर्वी पालिकेची आणि खासगी मिळून ३४ कोविड सेंटर सुरू होते. परंतु आता ती संख्या ११ वर आली आहे. त्या ठिकाणी एक हजार ९६९ बेड उपलब्ध असून ८६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १७८ रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

माजिवडा- मानपाडा, नौपाडा, उथळसर, वर्तकनगर धोक्याच्या वळणावर

गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यानुसार महापालिकेने नेमकी ही वाढ कोणत्या भागातून होत आहे, याची पाहणी सुरू केली आहे. सध्या महापालिकेच्या माजिवडा - मानपाडा, नौपाडा, उथळसर आणि वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही या प्रभाग समितीमधील नेमकी कोणत्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे, त्याची पाहणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित साहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.

एक नवीन सेंटर होणार सुरू

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्याच्या घडीला १० सेंटर सुरू असून भाईंदरपाडा येथील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी एक इमारत सज्ज केली आहे. त्यानुसार ११ कोविड सेंटर सुरू झाली आहेत. तर ज्युपिटर रुग्णालयासमोर असलेल्या पार्किंगच्या जागेवर कोविड सेंटर उभारले असून येथे एक हजार १७७ बेड आहेत. येत्या काही दिवसांत हे सेंटरही सुरू करण्यात येणार आहे.

संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा

------------