शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका ‘खड्ड्यां’तच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:48 IST

शहराच्या विविध भागांत पावसाने रस्त्यांची चाळण केली आहे. त्यासाठी वेगवेगळी आंदोलनेही झाली. त्यात तथ्य असल्याचे आता महापालिकेच्या प्रशासनानेच कबूल केले असून ४५१ खड्डे बुजवण्याचे शिल्लक असल्याचे सत्य उघड केले आहे.

ठाणे : शहराच्या विविध भागांत पावसाने रस्त्यांची चाळण केली आहे. त्यासाठी वेगवेगळी आंदोलनेही झाली. त्यात तथ्य असल्याचे आता महापालिकेच्या प्रशासनानेच कबूल केले असून ४५१ खड्डे बुजवण्याचे शिल्लक असल्याचे सत्य उघड केले आहे.काही दिवसांवर महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा येऊन ठेपली आहे. पुढील महिन्यात गणेशोत्सवदेखील आहे. बुधवारी महापौरांनी मॅरेथॉन मार्गांची पाहणी केली असता, या मार्गांवर खड्डे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असून त्यांनी खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत.मागील काही दिवसांपासून शहरात मनसे आणि भाजपाच्या वतीने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात आंदोलनदेखील झाले आहे. पालिकेच्या वतीने हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले, तरी त्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक अशा जेट पॅचर मशीनचा आधार घेतला आहे. या यंत्रणेमुळे तत्काळ खड्डे बुजवणे शक्य होत असल्याचा पालिकेचा दावा आहे. यासाठी पालिकेने दोन कोटी मोजले आहेत. परंतु, ही यंत्रणादेखील कुचकामी ठरत असल्याचे दिसले आहे.दरम्यान, महापालिका हद्दीत आजघडीला एकूण २९९५ चौरस मीटर क्षेत्रफळावर १३१४ खड्डे असून त्यातील १९८१ चौरस मीटर क्षेत्रफळावरील ८६३ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार, सद्य:स्थितीत १०१८.१५ चौरस मीटर क्षेत्रफळावरील जागेत ४५१ खड्डेच शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तेदेखील येत्या आठवडाभरात बुजवले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.2995 चौरस मीटर क्षेत्रफळावर १३१४ खड्डे असून त्यातील १९८१ चौरस मीटर क्षेत्रफळावरील ८६३ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार, सध्या ४५१ खड्डेच शिल्लक असून लवकरच ते बुजवले जातील.खड्ड्यांच्या तक्रारींसाठी पालिकेने स्टार ग्रेड अ‍ॅप सुरू केले होते. परंतु, संबंधित ठेकेदाराचा कार्यकाळ संपल्याने आता हे अ‍ॅपही बंद झाले आहे. त्यामुळे शहरात नेमके किती खड्डे आहेत, याचा अंदाज पालिकेला मिळणे कठीण झाले आहे. हे अ‍ॅप सुरू करण्याबाबत हालचाली सुरू असल्या, तरी ते अद्यापही बंदच आहे.