शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिकेची आता एसी शौचालये

By admin | Updated: July 16, 2017 02:57 IST

ठाणे महापालिकेने शहरातील विविध प्रकल्प बीओटी, पीपीपी तत्त्वावर राबवण्याचे निश्चित केले असताना आता शहरातील मुख्य रस्त्यांवर पीपीपी तत्त्वावरच उच्च दर्जाची

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील विविध प्रकल्प बीओटी, पीपीपी तत्त्वावर राबवण्याचे निश्चित केले असताना आता शहरातील मुख्य रस्त्यांवर पीपीपी तत्त्वावरच उच्च दर्जाची शौचालयेदेखील उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरात १६ ठिकाणी ती उभारली जाणार असून पुढील १५ वर्षांसाठी निगा, देखभालीसाठी खाजगी ठेकेदाराकडे दिली जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर येणार आहे.शहराची लोकसंख्या २२.५० लाखांच्या आसपास आहे. शहरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची उपलब्धता करून देण्याची जबाबदारीसुद्धा पालिकेचीच आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक एक किमी अंतरावर सार्वजनिक शौचालय असावे, असे निर्देश आहेत. तसेच शहरात उच्च दर्जाचे शौचालय असावे, ही नागरिकांची मागणी विचारात घेऊन पालिका शहरातील मुख्य रस्त्यांवर वातानुकूलित सार्वजनिक शौचालये उभारणार आहे. यानुसार, शहरातील आनंदनगर जकातनाका, तलावपाळी, आर मॉलसमोर, टिकुजिनीवाडी रोड, मानपाडा, वर्तकनगरनाका, रोड नं. १६ वागळे इस्टेट, कळवानाका, मानपाडानाका, उथळसरनाका, कापूबावडीनाका, कासारवडवलीनाका, मिडोज (पवारनगर), शास्त्रीनगरनाका, नितीन कंपनी फायर ब्रिज आॅफिसपुढे, विटावा जकातनाका, गायमुख चौपाटी आदी ठिकाणी ती उभारली जाणार आहेत. ही शौचालये व मुताऱ्या बांधण्याचा खर्च संबंधित संस्था करणार आहे. तसेच शौचालयांसाठी वीज, पाणी व साफसफाईसाठी लागणारे मनुष्यबळ, इतर साधनसामग्रीसाठी येणारा भांडवली खर्च संस्थेमार्फत केला जाणार आहे. - १६ जागांपैकी जेथे फूटओव्हर ब्रिज आहे तेथे दोन्ही बाजूंनी, तर जेथे फूटओव्हर ब्रिज नाही, अशा ठिकाणी ५० बाय २० आकाराचे दोन जाहिरातींचे होर्डिंग्ज व शौचालयाच्या भिंतीवर फलक उभारण्याची मुभा असणार आहे.शहरात पालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. शौचालयासाठी आवश्यक वीज व पाणीपुरवठा घेण्यासाठी पालिकेकडून नाहरकत दाखला देण्यात येणार आहे.